मनाची शुद्धता

 

मनाची शुद्धता

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 04/05/2026 :

जीवनात अनेकदा असे प्रसंग येतात की, आपली द्विधा मनस्थिती होते. 'हे करू का ते?', 'करू का नको?' अशा संभ्रमात आपण सापडतो.

अशा वेळी कधी आपण बरोबरीच्यांचा, तर कधी मोठ्यांचा सल्ला घेतो. मात्र, त्यांनी दिलेला सल्ला आपल्याला जमेलच किंवा पटेलच असे नसते. मग आपण अजूनच भांबावून जातो; नेमके काय करावे, तेच कळत नाही.

खरे तर प्रसंग समजावून घेऊन आपण स्वतःशीच स्थिर मनाने संवाद साधला पाहिजे. शक्य असणाऱ्या गोष्टी, येणाऱ्या अडचणी, त्यांवरील उपाय आणि अशक्य बाबी; या सर्वांचा बारकाईने विचार करून निर्णय घेतला, तर तो योग्यच ठरतो. आणि समजा, निर्णय चुकला तरी त्यातून मिळणाऱ्या अनुभवातून पुढे शिकता येते.

आजचा संकल्प

आपल्या अडचणींवर आपल्यालाच मार्ग काढायचा असल्यामुळे, गोंधळून न जाता शांत मनाने सर्व बाजूंनी विचार करू आणि योग्य निर्णय घेऊ.

सौ. स्नेहलता स. जगताप.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या