मनाची शुद्धता
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 21/05/2026 :
स्वच्छता हा आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. तो सर्वांनाच आवडतो असे नाही, पण बहुसंख्य लोक स्वच्छतेला महत्त्व देतात. त्यामध्ये स्त्रियांचे प्रमाण अधिक असते.
वैयक्तिक स्वच्छता, घराची, परिसराची आणि सार्वजनिक ठिकाणांची अशी प्रत्येक पातळीवरील स्वच्छता महत्त्वाची असते. कचरा गोळा करून योग्य ठिकाणी, योग्य प्रकारे त्याची विल्हेवाट लावली की आपल्याला एक वेगळे समाधान मिळते.
त्यासाठी कचरा जास्त होणार नाही याची वेळच्या वेळी काळजी घेतली, तर स्वच्छतेचा ताण येत नाही. घरातील कचरा नेहमी कचरापेटीतच टाकला तर परिसर स्वच्छ राहतो. इतकी जरी काळजी प्रत्येकाने घेतली, तरी आपली सार्वजनिक ठिकाणे सुद्धा नेहमी स्वच्छ राहतील.
आजचा संकल्प
रस्त्यात, जिन्यात वाटेल तिथे थुंकणे, हातातील निरुपयोगी गोष्टी कुठेही टाकणे, उघड्यावर प्रातर्विधी करणे या आणि अशा प्रकारच्या अस्वच्छतेला कारणीभूत ठरणाऱ्या गोष्टी करण्याचे आपण पूर्णपणे टाळूया आणि आपली सामाजिक जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडूया.
सौ. स्नेहलता स. जगताप.

0 टिप्पण्या