विचारधारा

विचारधारा 

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 06/05/2026 :

तुम्ही जेव्हा अनोळखी ठिकाणी जाता, तेव्हा आसपासच्या माणसांचा परिचय नसतो. तिथली ठिकाणे आणि रस्ते अनोळखी असतात; क्वचित तिथली भाषाही वेगळी असू शकते.

अशा वेळी थोडे सावध वागायचे. घरच्यांच्या परवानगीशिवाय कुठेही जाणे किंवा अनोळखी माणसावर विश्वास ठेवणे पूर्णपणे टाळा. कोणी खाऊ दिला, मोबाईल दाखवतो म्हणाले किंवा कोणतेही आमिष दाखवले, तरी मोहात पडायचे नाही.

मुलांनो, सध्या समाजात काही विकृत माणसांची संख्या वाढू लागली आहे; जी मुलांच्या जीवाशी खेळतात आणि नको ती कृत्ये करतात. मी तुम्हाला भीती घालत नाही, तर फक्त सावध करत आहे.

तुम्हाला थोडे जरी काही वेगळे वाटले, तरी तिथून लगेच पळ काढा आणि ही गोष्ट मोठ्यांच्या लक्षात आणून द्या.

सौ. स्नेहलता स. जगताप.

=====================

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या