विवाहाची आमंत्रणपत्रिका देऊन अपमान करण्याची पद्धत म्हणजे लग्नातले स्वागत व सत्कार समारंभ!

 विवाहाची आमंत्रणपत्रिका देऊन अपमान करण्याची पद्धत म्हणजे लग्नातले स्वागत व सत्कार समारंभ!

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 01/05/2026 :

लग्नकार्यात आलेल्या काही मोजक्या श्रीमंत पैसेवाले व मोठ्या लोकांचे स्टेजवरून नाव घेऊन स्वागत करण्याची पद्धत म्हणजेच आलेल्या इतर सर्व नातेवाईक व मित्रपरिवाराचा अप्रत्यक्षपणे अपमान समजावा का!त्यांचा सत्कार सन्मान अवश्य करा पण त्यांना घरात बोलावून पाटावर बसुन फार वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना आपण सन्मानित करु शकतो पण लग्नाच्या वेळेस टाळा हे तमाशे.  

 ते म्हणजे वेळात वेळ काढुन आले आणि बाकीचे येणारे काही रिकामटेकडे आहेत का?

अशा फालतू प्रथा बंद करायला पाहिजेत,असे सुचवावेसे वाटते.

प्रतिष्ठित असोत की पुढारी, कुणाचेही शब्दसुमनानी स्वागत करणे हेही  बंद केलं पाहिजे. प्रतिष्ठित मान्यवरांचे नाव घेऊन स्वागत करायचे म्हणजे लग्नाला पैसे खर्चून येणारे बाकीचे हॉलमधील सगळे समाजबांधव अप्रतिष्ठीत  असतात का? नाही. निमंत्रणाचा स्वीकार करून वधु वरांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले सर्वच समाज बांधव आणि भगिनी, आप्तेष्ट तसेच मित्रपरिवार देखील आलेले असतात,जे विवाह सोहळ्यास वेळेवर उपस्थित राहून सोहळ्याची प्रतिष्ठा वाढवितात. तेव्हा प्रारंभीच उपस्थित सर्व वऱ्हाडी मंडळींचे शाब्दिक स्वागत करून पुढील विवाह विधी नियोजित वेळेवर पार पाडण्याची काळजी घेतली पाहिजे,असे सुचवावेसे वाटते. 

आपले मामा काका आत्या मावश्या इतर नातेवाईक मित्र मंडळी जे गरीब आहेत परंतु तुमच्या लग्न कार्याला पहिल्यापासून व शेवटपर्यंत उपस्थिती दाखवतात ते नातेवाईक महत्त्वाचे नाही का? खोट्या प्रतिष्ठेपायी आपण गरीब असलेले आपले नातेवाईक यांची अवहेलना करत नाही का ?

आमदार खासदार मोठी प्रतिष्ठित माणसे  ज्यांना फेटे बांधून फुलहार गुच्छ देऊन त्यांची वाहवा करतात काही जनता तर लोटांगणच घालते ते फक्त फोटो काढणे पुरते मर्यादित असतात ते पुढे दुसरे लग्न आहे दुसरे काम दुसरी मीटिंग असे सांगून जेवण न करता निघून जातात तुमच्या लग्नातील अन्नाचा अपमान करतात अशांना महत्व देणे टाळावे जे तुमच्या कार्यात पहिल्यापासून तर शेवटपर्यंत हजर असतील त्यांनाच महत्व देणे गरजेचे आहे. 

आणखी काही सुचवावेसे वाटते ते असे, ज्यांचा सत्कार केला नाही किंवा ज्यांचे नाव घेतले नाही अशा लोकांनी मंडपातून/कार्यालयातून भराभर बाहेर पडून आपली नाराजी व्यक्त करावी. असे केल्याने ही प्रथा बंद होण्याची शक्यता जास्त आहे.काय करायचे ते आपल्याच हातात आहे.पण मी पुढाकार कसा घेऊ असा प्रत्येकाचा विचार!! परंतु हे लवकरच घडेल.

संतोष राजाराम राऊत

मापगावं, अलिबाग.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या