विचारधारा

 

विचारधारा 

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 17/05/2026 :

आपल्या घरातील, नात्यांतील किंवा मित्रपरिवारातील मोठी माणसे जशी वागतात, तसे वागण्याचे आपण नकळत अनुकरण करत असतो. आपण त्यांच्यासारखेच वागण्याचा आणि बोलण्याचा प्रयत्न करतो.

हीच गोष्ट उलट बाजूने पाहिली, तर आपल्या अवतीभवती वावरणारी लहान मुले सुद्धा आपलेच अनुकरण करत असतात. आपण जसे वागतो-बोलतो, तसेच ती देखील वागतात आणि बोलतात.

मुलांनो, म्हणूनच आपण अत्यंत विचारपूर्वक आपले वर्तन ठेवले पाहिजे. भाषा नेहमी सुसंस्कृत आणि व्यवस्थित वापरणे, मोठ्यांशी आदराने बोलणे, शिक्षकांचा मान राखणे, एकमेकांशी प्रेमाने वागणे आणि आई-वडिलांच्या आज्ञा पाळणे हे आपल्याला जमलेच पाहिजे.

आपण जसा इतरांचा चांगला आदर्श घेतो, तसाच आपलाही आदर्श कोणीतरी घेणार असते, हे विसरू नका.

सौ. स्नेहलता स. जगताप.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या