स्टँडर्ड जर्नलिझम आणि अजेंडा ड्रिव्हन जर्नलिझम मधील फरक

 

स्टँडर्ड जर्नलिझम  आणि अजेंडा ड्रिव्हन जर्नलिझम मधील फरक

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 21/05/2026 :

स्टँडर्ड जर्नलिझम  आणि अजेंडा ड्रिव्हन जर्नलिझम  मधील फरक समजणे इतके कठीण नाही. तुम्हाला पुरावा पाहायचा आहे का? हा फोटो ओस्लो येथील एका संयुक्त प्रेस ब्रीफिंगचा आहे, ज्यामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नॉर्वेचे पंतप्रधान दोघेही उपस्थित आहेत. लक्षात ठेवा की ही एक 'प्रेस ब्रीफिंग' होती, 'प्रेस कॉन्फरन्स' नाही. प्रेस ब्रीफिंगमध्ये नेते आपले वक्तव्य देतात आणि निघून जातात, तिथे प्रश्न विचारण्याची पद्धत नसते. परंतु, त्याच वेळी एका नॉर्वेजियन पत्रकाराने प्रवेश केला. जेव्हा पंतप्रधान मोदी या प्रेस ब्रीफिंगनंतर तिथून निघू लागले, तेव्हा तिने केवळ व्हायरल होण्यासाठी त्यांना मागून आवाज दिला, "पंतप्रधान मोदी, तुम्ही जगातील सर्वात स्वतंत्र पत्रकारितेच्या देशाकडून काही प्रश्न का घेत नाही?" एवढेच नाही तर लिफ्ट बंद होईपर्यंत ओरडत ओरडत व्हिडिओ बनवण्याची हीन कृत्यही तिने केले.

तिची पार्श्वभूमी तपासली तर असे दिसून येते की, मोदींचा व्हिडिओ टाकण्यापूर्वी तिची शेवटची पोस्ट एप्रिल २०२४ मधील होती, म्हणजेच दोन वर्षांपूर्वीची. आणि तिने आपले सोशल मीडिया अकाउंट नुकतेच व्हेरिफाय केले आहे. याचा अर्थ तिचा तथाकथित 'स्वतंत्र आणि प्रामाणिक पत्रकारितेचा' किडा अचानक जागा झाला. ती ज्या वृत्तपत्रासाठी काम करते, त्याचे एक्स (ट्विटर) वर केवळ ४८,००० फॉलोअर्स आहेत. त्यांचे शेवटचे पोस्ट देखील २२ जानेवारी २०२६ चे आहे. हे मीडिया हाऊस नॉर्वेच्या टॉप ४० वृत्तपत्रांमध्येही येत नाही आणि त्यांचे पेड सबस्क्रिप्शन्स १४,००० पेक्षा कमी आहेत; म्हणजेच आपल्या पत्रकारांना पगार देण्यासाठीही त्यांची ओढाताण सुरू आहे. ही महिला आधीपासूनच ट्विटरवर राणा अयुब आणि इंडियन नॅशनल काँग्रेसला फॉलो करते. हा अँटी-मोदी अजेंडा कोणाकडून तरी प्लॅन केला गेला होता का? कारण काँग्रेस आयटी सेल आणि राहुल गांधी यांनी लगेचच या कृत्याचा वापर मोदींवर टीका करण्यासाठी सुरू केला आणि राहुल गांधींनी तर तो व्हिडिओ शेअर देखील केला.

राहुल गांधींच्या पोस्टमुळे या प्रकरणाला गती मिळताच, तिने वेळ न घालवता थेट फोन इंटरव्यूची मागणी केली आणि विषय काय होता? तर लोकशाही किंवा मानवाधिकार नाही, तर 'पॉइंट मोदींची नॉर्वेजियन भेट'. पण खरी गंमत तर पुढे आली; जेव्हा सोशल मीडियावर "मोदींनी उत्तर दिले नाही" हा नरेटिव्ह चालवला जात होता, तेव्हा ओस्लो येथील भारतीय दूतावासाने याकडे दुर्लक्ष न करता, अशा अप्रासंगिक पत्रकाराला अधिकृतपणे निमंत्रण दिले की, "या आणि समोरासमोर प्रश्न विचारा." त्यानंतर जे झाले ते पाहण्यासारखे होते. एमईए (MEA) चे सचिव सिबी जॉर्ज यांच्यासोबत तिचा सामना झाला. तिथेही तिने आपला अजेंडा चालवण्याचा प्रयत्न केला आणि विचारले, "परकीय देशांनी भारतावर का विश्वास ठेवावा?" यावर सिबी जॉर्ज यांनी अत्यंत शांतपणे आणि सन्मानपूर्वक उत्तर दिले. परंतु, ती त्यांना वारंवार अडथळा आणत होती आणि उत्तर ऐकण्याची तिची तयारी नव्हती. शेवटी, उत्तर न ऐकता ती तिथून उठून पळून गेली.

याला पत्रकारिता म्हणावे की केवळ वैयक्तिक हल्ला? तिच्या दुटप्पीपणाबद्दल काय सांगावे! तिला भारताच्या लोकशाहीची खूप काळजी आहे, पण जेव्हा नॉर्वेचे पंतप्रधान अमेरिकेत गेले होते, तेव्हा तिने ट्रम्प यांना विचारले होते की, "तुम्ही ग्रीनलँड कसे मिळवणार?" ग्रीनलँड हा डेन्मार्कचा भाग आहे, मग तेव्हा तिला लोकशाही आणि सार्वभौमत्वाची आठवण का आली नाही? अशी आदर नसलेली कृत्ये पत्रकारिता नसून, एका स्वस्त राजकीय साधनांचा भाग असतात आणि म्हणूनच आजकाल लोक अशा पारंपारिक माध्यमांचा तिरस्कार करू लागले आहेत.

✍🏻विशाल देशपांडे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या