बर्वे 卐 वाघमोडे शुभविवाह थाटाने संपन्न



बर्वे 卐 वाघमोडे शुभविवाह थाटाने संपन्न

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 06/05/2026 :

कै. दगडू मारुती बर्वे यांचे नातू व श्री साधू दगडू बर्वे राहणार पाटीलवस्ती - बागेचीवाडी, अकलूज, तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर यांचे द्वितीय चिरंजीव आकाश आणि श्री नारायण रामचंद्र वाघमोडे यांची नात व श्री बापूराव नारायण वाघमोडे राहणार पिठेवाडी, तालुका इंदापूर जिल्हा पुणे यांची जेष्ठ कन्या चि. सौ. कां. कोमल यांचा शुभविवाह बुधवार दिनांक 6 मे 2026 रोजी दुपारी 12 वाजून 23 मिनिट या शुभमुहूर्तावर संपन्न  झाला. 

भगवंत मंगल कार्यालय, सदाशिवनगर नजीक जाधववाडी रोड, पुरंदावडे येथे अत्यंत थाटाने संपन्न झालेल्या या विवाह सोहळ्याप्रसंगी उभयपक्षाकडील सर्व क्षेत्रातील, सर्व स्तरातील मान्यवरांनी उपस्थित राहून नववधूवरांना शुभ आशीर्वाद दिले या शुभ लग्न सोहळ्याप्रसंगी उपस्थित असणाऱ्या सर्वांचे बर्वे आणि वाघमोडे परिवाराच्या वतीने स्वागत आणि सन्मान करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या