मनाची शुद्धता
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 08/05/2026 :
हक्क आणि कर्तव्य ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. संविधानाने आपल्याला आपले अधिकार दिले आहेत, तशीच कर्तव्येही सांगितली आहेत.
आपण आपल्या हक्कांसाठी नेहमीच जागरूक असतो. घर असो, नातेवाईक असो, मित्रपरिवार असो किंवा समाज; आपल्याला वैयक्तिक व सामूहिक स्तरावर आपले हक्क हवेच असतात.
मात्र, तितक्याच जबाबदारीने आपण आपली कर्तव्ये पार पाडतो का? कुटुंबात किंवा सामाजिक ठिकाणी इतरांशी असलेले आपले संबंध कर्तव्यपूर्तीच्या भावनेने जपले जातात का?
आजचा संकल्प
आपण प्रत्येकाने एक आदर्श भारतीय नागरिकाची भूमिका पार पाडताना, केवळ हक्कांसाठी आग्रही राहण्याऐवजी आपली कर्तव्ये प्रामाणिकपणे पार पाडू आणि पुढील पिढीवर चांगल्या संस्कारांची पेरणी करू.
सौ. स्नेहलता स. जगताप

0 टिप्पण्या