सोलापूर शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने,मार्केट यार्ड गेटसमोर भव्य जनआक्रोश रस्ता रोको आंदोलन

 

सोलापूर शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने,मार्केट यार्ड गेटसमोर भव्य जनआक्रोश रस्ता रोको आंदोलन

वृत्त एकसत्ता न्यूज 

सोलापूर, प्रतिनिधी दिनांक 25/05/2026 : 

सोलापूर शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने, सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी व सर्वसामान्य जनतेच्या विविध ज्वलंत प्रश्नांवर उद्या  (दि. 26 मे रोजी) सकाळी ८.०० वाजता मार्केट यार्ड चौक, गेट समोर, हैदराबाद रोड, सोलापूर येथे भव्य जनआक्रोश रस्ता रोको आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

भाजप महायुती सरकारच्या जनविरोधी धोरणांविरोधात हे आंदोलन करण्यात येणार असून, शेतकरी व नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधण्यात येणार आहे. विशेषतः सोयाबीन पीक विमा, कांद्याला हमीभाव, पेट्रोल-डिझेल व गॅस दरवाढ, इंधन तुटवडा, खत-बियाण्यांच्या वाढत्या किमती तसेच शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या विविध समस्यांबाबत आंदोलनातून तीव्र आवाज उठविण्यात येणार आहे. 

“बळीराजाच्या न्याय्य हक्कासाठी आता संघर्ष अटळ” असा निर्धार व्यक्त करत काँग्रेस पक्षाच्या वतीने या आंदोलनासाठी सोलापूर शहर व जिल्ह्यातील शेतकरी बांधव, नागरिक, काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सर्व हितचिंतकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आंदोलन यशस्वी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

“या रस्ता रोको आंदोलनात सहभागी होऊन आपल्या हक्काचा आवाज बुलंद करा” असे आवाहन जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सातलिंग शटगार तसेच शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांनी केले आहे.

▬▬▬ஜ۩(tp)۩ஜ▬▬▬

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या