मनाची शुद्धता
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 06/05/2026 :
जीवनात नेहमीपेक्षा काहीतरी वेगळे किंवा त्रासदायक घडले, की आपण लगेच त्रागा करतो, वैतागतो. त्या गोष्टीचा आपल्याला किती त्रास होतोय, याची चर्चा करतो आणि आपली नाराजी व्यक्त करतो.
ती अडचण नैसर्गिक असो वा मानवनिर्मित, आपण काही ना काही व्यक्त होतोच. पण काही लोक जे परिस्थिती आहे, ती आहे तशी मान्य करून स्वतःचे काम कर्तव्यबुद्धीने करत राहतात.
शेतात राबणारा बळीराजा, सीमेवर तैनात असलेला सैनिक बंधू व चुलीपुढे रांधणारी गृहिणी; खूप उन्हाळा आहे म्हणून रजेवर जात नाहीत किंवा गोठवणारी थंडी असली, तरी कर्तव्यात कसूर करत नाहीत.
आजचा संकल्प
नैसर्गिक परिस्थिती आपल्या नियंत्रणात नाही याची जाणीव ठेवत, आपली कर्तव्ये पार पाडू. स्वतःला जपत इतरांचीही काळजी घेऊ.
सौ. स्नेहलता स. जगताप.
=====================

0 टिप्पण्या