विचारधारा

 

विचारधारा

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 21/05/2026 :

आपण लहानाचे मोठे होत असताना आपल्या सभोवताली घडणाऱ्या अनेक गोष्टींचे आणि व्यक्तींचे सतत निरीक्षण करत असतो. त्यातून योग्य-अयोग्य असे परीक्षणही आपण करत असतो. मोठी माणसे जेव्हा लबाडी करतात, तेव्हा ते आपल्याला अजिबात आवडत नाही.

तरीही कधी कधी परिस्थितीमुळे किंवा नाईलाजाने आपल्याकडूनही काही चुका घडतात. मात्र, नंतर आपली चूक लक्षात येणे आणि ती सुधारणे, या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात; अन्यथा तीच चूक जर सवयीची झाली, तर तिथून माघारी फिरणे खूप कठीण होऊन बसते.

मुलांनो, नीतिमत्तेने वागणे थोडे कठीण असले तरी तोच रस्ता कायम योग्य असतो. कोणालातरी फसवून जर तुम्ही आपला स्वार्थ साधत असाल, तर आज ना उद्या ते सत्य बाहेर येतेच. पुढे मोठे झाल्यावर याच वाईट सवयी माणसाला भ्रष्ट बनवतात.

लक्षात ठेवा, भ्रष्टाचाराने अन्यायाचे भरपूर कमावण्यापेक्षा, प्रामाणिकपणे मिळालेले पोटापुरते अन्नही आपल्याला जास्त मानसिक शांतता देते.

सौ. स्नेहलता स. जगताप.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या