रोकडे 卐 प्रक्षाळे कसबे 卐 सावंत यांचा मंगल परिणय संपन्न

 

रोकडे 卐 प्रक्षाळे

कसबे 卐 सावंत यांचा मंगल परिणय संपन्न

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 17/05/2026 : आयु. श्रावण धोंडीबा रोकडे यांची नात व आयु. समाधान श्रावण रोकडे राहणार चळे यांची द्वितीय सुकन्या उपासिका दिव्या आणि आयु.रेमदेव हरिश्चंद्र प्रक्षाळे यांचा नातू व बु. विजय रेमदेव प्रक्षाळे राहणार सुस्ते यांचे चिरंजीव उपासक विक्रम यांचा तसेच आयु. ज्ञानू भीमराव कसबे यांचा नातू व आयु. बाळू ज्ञानू कसबे राहणार गोणेवाडी यांचे चिरंजीव उपासक तेजस आणि आयु नागप्पा नामदेव सावंत यांची नात व आयु चिदानंद नागप्‍पा सावंत राहणार आरळी यांची सुकन्या उपासिका प्रणाली यांचा मंगल परिणय रविवार दिनांक17/5/2026 रोजी दुपारी 12 : 45 वाजता संपन्न झाला. 

वृंदावन मंगल कार्यालय पंढरपूर -  टेंभुर्णी रोड, गुरसाळे, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर येथे अत्यंत थाटाने संपन्न झालेल्या या परिणय सोहळ्याप्रसंगी उभय पक्षाकडील सर्व क्षेत्रातील, सर्व स्तरातील मान्यवरांनी उपस्थित राहून नव वधूवरांना शुभाशिर्वाद दिले. या मंगल समयी उपस्थित मान्यवरांचा रोकडे, प्रक्षाळे, कसबे, सावंत परिवाराच्यावतीने स्वागत सन्मान करण्यात आला. याप्रसंगी सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष सातलिंग आ. शटगार यांच्यावतीने समाधान श्रावण रोकडे यांचा सन्मान करण्यात आला. त्याप्रसंगी माळशिरस तालुका काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष गिरीश प्रभाकर शेटे, अकलूज वैभव आणि वृत्त एकसत्ताचे संस्थापक संपादक, सेवा जेष्ठ पत्रकार भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या