माध्यमिक शालांत परीक्षेत लक्ष्मीबाई कन्या प्रशालेचा निकाल ९४.१७%
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 14/05/2026 :
शिक्षण प्रसारक मंडळ ,अकलूज संचलित लक्ष्मीबाई कन्या प्रशाला, यशवंतनगर च्या विद्यार्थिनींनी माध्यमिक शालांत परीक्षेत घवघवीत यश संपादन केले .प्रशालेतून एकूण ३२ विद्यार्थिनी विशेष श्रेणीमध्ये पास झाल्या. प्रशालेचा निकाल ९४.१७%इतका लागला. कु.श्रेया काळे ९२ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक, कु.प्रगती मासाळ व कु. आयेशा सय्यद या विद्यार्थिनींनी९०.८०टक्के गुण मिळवून द्वितीय , तसेच कु.कावेरी साठे हिने९०.६०टक्के गुण मिळवून प्रशालेत तृतीय क्रमांक प्राप्त केला .
यशस्वी सर्व विद्यार्थिनींचे कौतुक व अभिनंदन संस्थेचे जेष्ठ मार्गदर्शक संचालक जयसिंह मोहिते -पाटील,संस्थेचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते -पाटील ,संस्थेच्या संचालिका तथा प्रशालेच्या सभापती कु.स्वरूपाराणी मोहिते -पाटील,संस्थेचे सचिव अभिजीत रणवरे ,सहसचिव हर्षवर्धन खराडे ,प्रशाला समिती सदस्य व मुख्याध्यापिका अनिता पवार यांनी केले .

0 टिप्पण्या