मनाची शुद्धता
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 25/05/2026 :
कष्टकरी लोकांचे राहणीमान, त्यांचे कपडे, त्यांचे वागणे-बोलणे आणि पांढरपेशा समाजातील लोकांच्या वागण्या-बोलण्यात भरपूर तफावत असते.
अंगाला येणारा घामाचा वास, मळके कपडे किंवा अस्वच्छ हात-पाय कधीकधी नकोसे वाटतात; पाहायला सुद्धा संकोच वाटू शकतो. याउलट, छान कपड्यातील, अत्तर लावलेली आणि व्यवस्थित राहणीमान असलेली माणसे आपल्याला सहज आकर्षित करतात.
समाजातील ही दरी आपल्याला आर्थिक विषमता दर्शवते. परंतु, आपण मात्र सर्वांकडे नेहमी समान दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे. रंजल्या-गांजल्यांना जास्त आपुलकी दाखवली, त्यांच्याशी प्रेमाने वागलो, तर खऱ्या अर्थाने साने गुरुजींची 'खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे' ही प्रार्थना जगल्याचा आनंद आपल्याला मिळेल.
आजचा संकल्प
कोणाच्याही बाह्य दिसण्यापेक्षा त्याच्या 'असण्याकडे' पाहिले पाहिजे. राहणीमानापेक्षा समोरील व्यक्तीची विचारसरणी पारखूया. केवळ वरवरच्या रंगावर व रूपावर न भुलता, प्रत्येक माणसाला आदर देऊन आत्मिक सुख आणि समाधान देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करूया.
सौ. स्नेहलता स. जगताप.

0 टिप्पण्या