विचारधारा

 

विचारधारा 

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 23/05/2026 :

आपल्याला सहसा शिस्तप्रिय म्हणजेच कडक शिक्षक आवडत नाहीत. काहींना त्यांची भीती वाटते, तर काहींचा त्यांच्यावर राग येतो. ते कडक असतात म्हणजे नक्की काय करतात? तर शाळेत वेळेवर येणे, अभ्यास नियमित पूर्ण करणे, व्यवस्थित गणवेश परिधान करणे, याच गोष्टींचा ते आग्रह धरतात.

पुढील आयुष्यात ऑफिसला वेळेत जाणे, आपले काम प्रामाणिकपणे करणे, नेहमी टापटिप राहणे आणि मोठ्यांचा आदर करणे, या चांगल्या सवयी आपल्याला उपयोगी पडाव्यात, हाच त्यामागील खरा उद्देश असतो.

मुलांनो, घरी आपले पालक आणि शाळेत आपले शिक्षक हे सतत आपल्याला घडवण्याचे आणि आपल्यावर उत्तम संस्कार करण्याचे काम करत असतात. यशस्वी जीवनासाठी आवश्यक असलेली शिस्त लावण्याचा ते प्रामाणिक प्रयत्न करतात.

आपल्याला शिस्तप्रिय शिक्षक मिळणे हे आपले मोठे भाग्य असते; कारण मोठे झाल्यावरच तुम्हाला त्यांच्या या कडक शिस्तीचे खरे महत्त्व समजेल.

 सौ. स्नेहलता स. जगताप

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या