🟡 अधिक मासानिमित्त श्री क्षेत्र सोमेश्वर देवस्थान करंजे येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन
🔵 मार्गदर्शक ह भ प गुरुवर्य ज्ञानेश्वर माऊली शिंदे (श्री जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था अध्यापक आळंदी), प्रेरणास्थान व्यासपीठ चालक ह भ प दत्तात्रय महाराज फरांदे निंबुत
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 08/05/2026 : सोमवार दिनांक 1 जून ते 8 जून 2026 या कालावधीमध्ये मालू बाईच्या भक्तीने पावन झालेल्या पुण्यनगरी तीर्थक्षेत्र श्री क्षेत्र सोमेश्वर देवस्थान करंजे तालुका बारामती, जिल्हा पुणे येथे अधिक मास तपोपूर्ती सोहळ्या निमित्त (12 वा अधिक मास) श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व श्री सोमनाथ महात्म्य ग्रंथ पारायण सोहळा अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आलेले आहे अशी माहिती श्री क्षेत्र सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट करंजे यांच्यावतीने अकलूज वैभव आणि वृत्त एकसत्ता ला सांगण्यात आली.
या अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यामध्ये दररोज पहाटे ४ ते ६ काकडा भजन, सकाळी ६ ते ७ लघुरुद्र अभिषेक, सकाळी ७ :३० ते ११३० ज्ञानेश्वरी ग्रंथ व सोमनाथ ग्रंथ वाचन पारायण, दुपारी १२ ते २ महाप्रसाद, दुपारी २ ते ४ भजन, सायंकाळी ४:३० ते ५:३० प्रवचन, संध्या. ६ ते ७ हरिपाठ, सायं. ७ ते ९ किर्तन, रात्री ९ नंतर श्रींची आरती नंतर महाप्रसाद या प्रकारे दैनंदिन कार्यक्रम सुरू राहील.
दैनंदिन किर्तन सेवा -
सोमवार दिनांक १ जून रोजी ह भ प श्री सुरेश महाराज सुळ (संस्थापक श्री ज्ञानाई गुरुकुल शिक्षण संस्था संग्रामनगर -अकलूज), मंगळवार दिनांक २ भागवताचार्य उमेश महाराज दशरथे आळंदी, बुधवार दिनांक ३ ह भ प श्री योगेश महाराज पालखीवाले, (श्री संत एकनाथ महाराज संस्थान पैठण), गुरुवार दिनांक ४ ह भ प श्री केशव महाराज नामदास (श्री संत शिरोमणी नामदेव महाराज वंशज पंढरपूर), शुक्रवार दिनांक ५ ह भ प कानोबा महाराज देहूकर (श्री देवकर महाराज फड, पंढरपूर), शनिवार दिनांक ६ ह भ प जयंत महाराज गोसावी (श्री संत निवृत्तीनाथ महाराज संस्थान त्रंबकेश्वर नाशिक), रविवार दिनांक ७ ह भ प शिवराज काका महाराज देशमुख पंढरपूर, सोमवार दिनांक ८ जून २०२६ रोजी काल्याचे किर्तन सकाळी १० ते १२ वाजेपर्यंत ह भ प पांडुरंग महाराज घुले (प्रणेते श्री संत तुकाराम महाराज गाथा मंदिर देहु) यांचे काल्याचे किर्तन होईल.
शनिवार दिनांक ६ जून रोजी ९ ते १२ "नाचू भारुडाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी" भारुडरत्न ह भ प लक्ष्मण महाराज राजगुरू बावडा यांचे भारुड होईल.
सप्ताहाचे यंदा बारावी वर्ष असून श्रीक्षेत्र सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट करंजे तालुका बारामती जिल्हा पुणे यांचे व्यवस्थापन असून प्रमुख उपस्थिती वारकरी सेवा संघ बारामती, दौंड, इंदापूर, पुरंदर, शिरूर, भोर तालुका यांची आहे.

0 टिप्पण्या