भोसले 卐 जाधव शुभविवाह सोहळा संपन्न

 

भोसले 卐 जाधव शुभविवाह सोहळा संपन्न

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 13/05/2026 : अकलूज येथील श्रीमती शारदा प्रतापराव भोसले व व कै. प्रतापराव  भोसले  यांची कन्या चि. सौ. कां. गायत्री आणि श्री विठ्ठल मारुती जाधव राहणार 10 77, शुक्रवार पेठ, हिराबाग, पुणे यांचे चिरंजीव गुरुनाथ यांचा शुभविवाह  बुधवार दिनांक 13/05/2026 रोजी दुपारी  संपन्न झाला. 

संत सेना महाराज मंगल कार्यालय, आळंदी येथे अत्यंत थाटाने संपन्न झालेल्या या शुभ विवाह  सोहळ्याप्रसंगी माळशिरस तालुका काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष गिरीश प्रभाकर शेटे, सौ. स्मिता गिरीश शेटे, अकलूज वैभव व वृत्त एकसत्ता चे संस्थापक संपादक, सेवा जेष्ठ पत्रकार भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे, युवा नेते यशराज गिरीश शेटे, राजू श्रीपती शिंदे, सिद्धार्थ प्रताप भोसले, अभिषेक प्रताप भोसले, किरण राजेंद्र शिंदे, मधुकर भोसले, विठ्ठल जाधव, संगीता राजेंद्र शिंदे, श्रीमती शारदा प्रताप भोसले, सौ. वर्षा किरण शिंदे, सौ ज्योती सागर शिंदे, सौ. छायाबाई कारंडे यांचे सह वधू आणि वर पक्षाकडील आप्तेष्ट, नातेवाईक, मित्रपरिवार इत्यादींनी उपस्थित राहून नव वधू-वरांना शुभाशीर्वाद दिले. या विवाह सोहळ्यास उपस्थित असणाऱ्या मान्यवरांचा सन्मान भोसले आणि जाधव परिवाराच्या वतीने करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या