शेख 卐 पठाण शुभविवाह संपन्न

शेख 卐 पठाण शुभविवाह संपन्न

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 15/05/2026 :

अब्बास अब्दुल शेख यांचे नातू व हसन  अब्बास शेख राहणार सराफवाडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे यांचा मुलगा अल्ताफ राजा आणि इसाक पठाण यांची नात व  फिरोज इसाक पठाण राहणार वेळापूर, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर यांची मुलगी सानिया  यांचा शुभविवाह शुक्रवार दिनांक 15 /5 /2026 सकाळी ११ वाजून 35 मिनिटाने संपन्न झाला. शिवशंभो मंगल कार्यालय वेळापूर, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर येथे अत्यंत थाटाने संपन्न झालेल्या शुभविवाह सोहळ्याप्रसंगी उभय पक्षाकडील सर्व क्षेत्रातील, सर्व स्तरातील मान्यवरांनी उपस्थित राहून  नववधूवरांना शुभाशीर्वाद दिले. याप्रसंगी माळशिरस तालुका काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष गिरीश प्रभाकर शेटे, अकलूज वैभव आणि वृत्त एकसत्ताचे संस्थापक संपादक,सेवा ज्येष्ठ पत्रकार भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे, यशराज गिरीश शेटे यांनीही विवाहानिमित्त शुभेच्छा दिल्या. उपस्थित मान्यवरांचे शेख आणि पठाण परिवाराच्या वतीने स्वागत सन्मान करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या