विचारधारा

 

विचारधारा 

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 30/05/2026 :

शालेय जीवनात मित्र अनेक असतात, पण शेवटपर्यंत टिकणारे खूप थोडे असतात. प्राथमिक शाळेत असताना आपल्याला सगळीच मुले आपले मित्र वाटतात; मात्र आपण जसे मोठे होत जातो, तशी ही संख्या हळूहळू कमी होत जाते.

काळानुसार मित्र बदलतात. शाळेतले मित्र वेगळे, क्लासमधले वेगळे, तर शेजारी राहणारे वेगळे, असे मित्रांचे वेगवेगळे गट तयार होतात. नंतर अनुभवानुसार त्यातलेच काही निवडक मित्र आपले अत्यंत जवळचे आणि जीवाभावाचे होतात.

मुलांनो, आयुष्यात तात्पुरते आणि वरवरचे मित्र अनेक असतात, पण मनातील गुपिते सांगावीत असे मित्र खूप कमी असतात. जिथे विचार जुळतात, तिथेच मैत्री दीर्घकाळ टिकते. जो आपल्याला योग्य सल्ला देतो, योग्य मार्गदर्शन करतो, अडचणीच्या वेळी धावून येतो आणि सावलीसारखा सोबत राहतो; तेच आपले कायमचे सखे-सोबती असतात.

त्यामुळे मित्रांच्या केवळ आनंदातच सहभागी न होता, त्यांच्या अडचणीच्या काळातही आपण खंबीरपणे सोबत राहूया आणि मैत्रीचे हे पवित्र नाते आयुष्यभर टिकवूया.

सौ. स्नेहलता स. जगताप.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या