मनाची शुद्धता

मनाची शुद्धता 

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 03/05/2026 :

आजच्या धावपळीच्या युगात आपण जगाशी जोडलेले राहण्यासाठी सोशल मीडिया आणि इतर साधनांचा सतत वापर करतो. कोणाचे काय चालले आहे, याकडे आपले पूर्ण लक्ष असते; पण या सगळ्यात आपण स्वतःशी मात्र दुरावत चाललो आहोत.

दिवसाभरात आपण अनेकांशी संवाद साधतो, पण कधी शांत बसून स्वतःशी दोन शब्द बोलतो का? आपले मन नेमके काय म्हणतेय, आपल्याला कशाची गरज आहे, हे समजून घेण्यासाठी 'स्व-संवाद' अत्यंत आवश्यक आहे. जेव्हा आपण स्वतःला वेळ देतो, तेव्हाच मनाला खरी शांतता मिळते.

बाहेरची गडबड थांबवता येत नसली, तरी स्वतःच्या विचारांचे योग्य नियोजन करून मनाचा गोंधळ नक्कीच कमी करता येतो. स्वतःशी प्रामाणिक राहून साधलेला हा संवादच आपल्याला मानसिक स्वास्थ्य मिळवून देतो.

आजचा संकल्प

दिवसातील किमान १० ते १५ मिनिटे सर्व उपकरणांपासून दूर राहून शांत बसू. स्वतःच्या विचारांचे निरीक्षण करू आणि स्वतःशी संवाद साधून मन प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करू.

सौ. स्नेहलता स. जगताप.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या