विचारधारा

 

विचारधारा

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 25/05/2026 :

आता उन्हाळ्याची सुट्टी संपायला साधारण १५ दिवस शिल्लक राहिले आहेत. लवकरच शाळेचे नवीन वर्ष सुरू होईल. नवीन वह्या-पुस्तके, गणवेश, दप्तर आणि इतर बऱ्याच साहित्याची खरेदी आता सुरू होईल. बाजारातही विविध प्रकारांत हे सर्व साहित्य उपलब्ध झाले आहे.

पण खरेदीला जाण्यापूर्वी, जर मागील वर्षाचे चांगल्या स्थितीतील इतर साहित्य (जसे की दप्तर, कंपॉस पेटी, वॉटर बॅग) तुमच्याकडे असेल, तर उगीचच नवीन खरेदीचा हट्ट धरू नका. घरात आधीपासून असलेल्या साहित्याचा पुरेपूर वापर करा; कोणतीही वस्तू अर्धवट वापरून टाकून देऊ नका.

मुलांनो, आपल्याला या चांगल्या सवयी शालेय वयातच लागल्या पाहिजेत. जीवनात बचत आणि काटकसर यांचे महत्त्व समजले पाहिजे. योग्य ठिकाणी योग्य तो खर्च जरूर करा, पण विनाकारण उधळपट्टी नको. "माझ्या मित्राकडे अमुक गोष्ट आहे, म्हणून मलाही तशीच पाहिजे," हा बालहट्ट पूर्णपणे टाळा.

आपल्या पालकांकडून वस्तू जपून आणि व्यवस्थित वापरण्याचा हा मोलाचा धडा आपण शिकूया आणि त्यांचा अनावश्यक खर्च टाळूया.

सौ. स्नेहलता स. जगताप.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या