विचारधारा
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 26/05/ 2026 :
आपले पालक आपल्याला नेहमी चांगल्या मुलांशी मैत्री करायला सांगतात. आपले मित्र कोण आहेत आणि कसे आहेत, याची ते सतत चौकशी करतात. शिक्षक सुद्धा आपल्याला चांगल्या संगतीत राहा, अमक्याची संगत सोड, असे सांगून सावध करत असतात.
त्यांचे हे सांगणे अगदी योग्यच असते. कारण आपल्या मुलाची संगत बिघडू नये, याची त्यांना काळजी असते. जर कोणी चार जणांनी सांगितले की, "तुमचा मुलगा वाया गेलेल्या मुलांच्या संगतीत असतो," तर त्यांना तुमची काळजी वाटणारच, होय की नाही?
मुलांनो, जगात पूर्णपणे वाईट कोणी नसते किंवा पूर्णपणे चांगलेही कोणी नसते. आणि मूळ म्हणजे कोणतीही 'व्यक्ती' मुळात वाईट नसतेच; तिच्यातील गुण चांगले किंवा वाईट असतात. आपण नेहमी समोरील व्यक्तीमधील चांगल्या गुणांचा स्वीकार केला आणि वाईट गुणांचा त्याग केला, की झाले!
त्यामुळे आपण नेहमी सगुणांशी मैत्री करून, प्रत्येकातील सद्गुण आपलेसे करूया आणि अशा प्रकारे स्वतःला उत्तम प्रकारे घडवूया.
सौ. स्नेहलता स. जगताप

0 टिप्पण्या