शिंदे पाटील 卐 अलंकार शुभविवाह थाटाने संपन्न



 शिंदे पाटील  卐 अलंकार  शुभविवाह थाटाने संपन्न

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 08/05/2026 :

श्री हनमंतराव तुकाराम शिंदे पाटील यांचे नातू व श्री धनंजय हनमंतराव शिंदे पाटील राहणार यशवंतनगर अकलूज तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर यांचे जेष्ठ चिरंजीव डॉ. धीरज आणि कै.बाबुराव लक्ष्मण अलंकार यांची नात व श्री दिपक बाबुराव अलंकार राहणार कारदगा, तालुका निपाणी, जिल्हा बेळगाव यांची कन्या डॉ. श्रुती यांचा शुभविवाह शुक्रवार दिनांक 8 मे 2026 रोजी दुपारी 12 :  35 वा. संपन्न झाला.

कृष्णाई मंगल कार्यालय पंढरपूर -  सातारा रोड, तांदुळवाडी, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर येथे  अत्यंत घाटाने संपन्न झालेल्या या शुभविवाह प्रसंगी उभय पक्षाकडील सर्व क्षेत्रातील, सर्व स्तरातील मान्यवरांनी उपस्थित राहून नववधूवरांना शुभाशीर्वाद  दिले.

या प्रसंगी माळशिरस तालुका काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष गिरीश प्रभाकर शेटे, सेवा जेष्ठ पत्रकार भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे यांच्यासह बहुसंख्य मान्यवर उपस्थित होते.

विवाह सोहळ्या प्रसंगी उपस्थित असणाऱ्या सर्व  मान्यवरांचे स्वागत आणि सन्मान शिंदे पाटील व अलंकार परिवाराच्या वतीने करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या