थांबून विचार करण्याचं भान फुल स्टॉप शिकवतो
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 25/05/2026 :
फुल स्टॉप म्हणजे वाक्याचा शेवट नसून विचाराला दिलेली थांबण्याची संधी असते. माणूस आयुष्यात धावत राहतो पण थांबून विचार करण्याचं भान फुल स्टॉप शिकवतो. जे बोलायचं असतं ते पूर्ण झालं आहे याची जाणीव तो करून देतो. आयुष्यातही काही गोष्टींना पूर्णविराम देणं आवश्यक असतं. नात्यांमधला त्रास, मनातली खदखद आणि न संपणारी अपेक्षा यांना फुल स्टॉप द्यावा लागतो. सतत चालू ठेवलेली वेदना माणसाला थकवते.
जिथे थांबायचं कळत नाही तिथे आयुष्य विस्कळीत होतं. फुल स्टॉप शिकवतो की प्रत्येक गोष्टीला मर्यादा असते. बोलताना थांबणं जितकं महत्त्वाचं तितकंच जगताना थांबणं गरजेचं असतं. न संपणाऱ्या वाक्यांसारखं आयुष्यही दमवणारं होतं. योग्य ठिकाणी फुल स्टॉप दिला तर पुढचं वाक्य सुंदर होतं. चुकीच्या ठिकाणी थांबलो तर अर्थ बदलतो. म्हणून आयुष्यातही योग्य वेळी थांबण्याचं शहाणपण हवं. फुल स्टॉप माणसाला संयम शिकवतो. आणि संयम असलेला माणूसच आयुष्य नीट लिहू शकतो.
✍️संकलन : प्रविण सरवदे, कराड
.

0 टिप्पण्या