विचारधारा
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 22/05/2026 :
आपले शिक्षक आपल्याला सर्वार्थाने घडवत असतात. शालेय शिक्षणासोबतच आपल्याला योग्य शिस्त लावणे, आपल्यावर उत्तम संस्कार करणे आणि आपले व्यक्तिमत्त्व घडवणे, यासाठी ते सातत्याने प्रयत्न करत असतात.
मात्र, बऱ्याचदा शिस्त लावणारे शिक्षक मुलांना आवडत नाहीत. मारणे किंवा रागावणे शासनाने कायद्यानेच बंद केले आहे. परंतु, केवळ गोड बोलून केलेले संस्कार मुलांमध्ये किती रुजतात, हे सांगणे अवघड आहे; कारण आजकाल मुलांना बेशिस्त वागणे जास्त आवडू लागले आहे.
मुलांनो, शिक्षक जर शिस्तप्रिय असतील, तरच पुढील पिढी देखील तितकीच सक्षम आणि सुसंस्कारीत घडते. आपण एक जबाबदार नागरिक म्हणून तेव्हाच यशस्वी होतो, जेव्हा आपल्याला शालेय जीवनातच योग्य शिस्त लागलेली असते. त्यामुळे नेहमी एक आज्ञाधारक विद्यार्थी व्हा.
शिस्त लावणाऱ्या शिक्षकांचा नेहमी आदर करा; कारण तुमचे संपूर्ण जीवन त्यांच्याकडूनच आकाराला येत असते.
सौ. स्नेहलता स. जगताप.

0 टिप्पण्या