विचारधारा
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 06/05/2026 :
सुट्टीत प्रवासाला जाणार, म्हणजेच पर्यटनाला किंवा मामाच्या गावाला! सोबत आई-वडील असणारच, त्यामुळे प्रवासात तुमची काळजी घेण्यासाठी ते असतीलच.
तरीसुद्धा, काही गोष्टींचे तारतम्य ठेवा. प्रवास सुरू असताना खिडकीतून हात किंवा डोके बाहेर काढू नका. मधल्या थांब्यावर त्यांना न सांगता परस्पर खाली उतरू नका. पालकांचे फोन नंबर पाठ करा किंवा लिहून जवळ ठेवा. काही अडचण आली, तर पोलीस मामांची मदत घ्या.
मुलांनो, महत्त्वाचे म्हणजे प्रवासात काही खाऊ खाल्ल्यावर त्याचा कचरा खिडकीतून बाहेर किंवा गाडीत खाली टाकू नका. तो कचरा एका प्लास्टिक पिशवीत साठवून ठेवा आणि उतरल्यावर योग्य ठिकाणी कचराकुंडीतच टाका.
बाहेरचे खाद्यपदार्थ खाणे टाळा आणि आपले आरोग्य जपा.
सौ. स्नेहलता स. जगताप.
=====================

0 टिप्पण्या