विचारधारा
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 24/05/2026 :
शिक्षक कडक असले की, आपण त्यांच्या भीतीने का होईना, पण आपला अभ्यास पूर्ण करतो, पेपर छान लिहितो आणि शिस्त पाळतो. या सगळ्यांतून साहजिकच आपण सतत घडत जात असतो.
परीक्षेच्या काळात तर, जेव्हा कडक पर्यवेक्षण करणारे शिक्षक वर्गात येतात, तेव्हा आपल्याला क्षणभर वाईट वाटते; पण नंतर लक्षात येते की, त्यांच्या कडक स्वभावामुळेच आपल्याला जे प्रामाणिकपणे येते आणि आठवते, तितकेच लिहिण्याची सवय लागते. आपण कोणावरही अवलंबून राहत नाही.
मुलांनो, यामुळेच आपण आयुष्याच्या परीक्षेत 'तावून-सुलाखून' निघतो आणि खऱ्या अर्थाने घडतो. लबाड शिक्षकांचे विद्यार्थी असण्यापेक्षा, अशा कडक आणि शिस्तप्रिय शिक्षकांचे विद्यार्थी आहोत, हे अभिमानाने सांगता येते; कारण आपण त्यामुळेच नीट अभ्यास करतो आणि स्वतःच्या बुद्धिमत्तेने यशस्वी होतो.
लक्षात ठेवा, आयुष्यात कोणतीही परीक्षा द्यायची असेल, तर ती नेहमी स्वतःच्या हिमतीवरच!
सौ. स्नेहलता स. जगताप

0 टिप्पण्या