सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये डिप्लोमा प्रवेश प्रक्रिया सुविधा केंद्राचे उद्घाटन
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 20/05/2026 :
शंकरनगर अकलूज येथील सहकार महर्षि शंकराव मोहिते पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च या अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये डिप्लोमा इंजिनिअरिंग (एफ सी ६७८२) २०२६-२७ वर्षाकरिता प्रवेश प्रक्रिया सुविधा केंद्राचे उद्घाटन शिवाजी नाळे यांच्या हस्ते संपन्न झाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण ढवळे यांनी दिली.
या सुविधा केंद्रामध्ये प्रथम वर्ष डिप्लोमा प्रवेश प्रक्रिया अर्जाची नोंदणी व अर्ज निश्चिती करता येणार आहे. सुविधा केंद्र सकाळी ९:३० ते सायंकाळी ६:०० वाजेपर्यंत चालू असणार आहे ग्रामीण भागातील विद्यार्थी व पालकांना डिप्लोमा इंजीनियरिंग अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेची गैरसोय होऊ नये या हेतूने महाविद्यालयाचे अध्यक्ष जयसिंह शंकरराव मोहिते पाटील व महाविद्यालयीन विकास समितीच्या अध्यक्षा कु. स्वरूपाराणी जयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डिप्लोमा इंजीनियरिंग प्रवेश प्रक्रिया सुविधा केंद्रामध्ये मोफत सोय देण्यात येणार आहे .पालकांनी व विद्यार्थ्यांनी सदर सुविधांचा लाभ घ्यावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण ढवळे यांनी केले आहे.


0 टिप्पण्या