मनाची शुद्धता
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 29/05/2026 :
मुलांना शिस्त लावणे ही फार मोठी, अवघड पण अत्यंत अत्यावश्यक बाब आहे. प्रत्येक पालकाने यासाठी स्वतः आधी शिस्तीत वागणे खूप महत्त्वाचे असते. दरवेळी केवळ गोड बोलूनच शिस्त लागेल असे नाही.
क्वचित प्रसंगी मुलांनी ऐकले नाही, तर सौम्य शिक्षा पण करावी लागते. चांगल्या सवयी लागण्यासाठी काही दिवस तीच गोष्ट पुन्हा-पुन्हा सांगणे आणि मुले त्यानुसार वागतात की नाही, यावर लक्ष ठेवणे गरजेचे असते. नियम पाळत नसतील तर काम पूर्ण केल्यावरच जेवण देणे आणि वेळेत पूर्ण केल्यास शाब्बासकी देणे योग्य ठरते.
सध्याची मुले दूरदर्शन व मोबाईल यांमध्ये जास्त वेळ घालवतात. त्यावर वेळीच बंधन घातले पाहिजे; कारण ते त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे. हे समजण्याचे त्यांचे वय नसल्याने, आपण पालकांनीच त्यावर योग्य नियंत्रण ठेवणे गरजेचे असते.
आजचा संकल्प
मुलांच्या मानसशास्त्राचे भान ठेवून, त्यांना जास्त न लाडवता योग्य ते वळण लागण्याच्या दृष्टीने आपण त्यांना योग्य शिस्त लावूया आणि त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी त्यांना खऱ्या अर्थाने घडवूया.
सौ. स्नेहलता स. जगताप.

0 टिप्पण्या