बारावी झाली… आता पुढे काय, पालकांनो?

 

बारावी झाली… आता पुढे काय, पालकांनो?

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 06/05/2026 :निकाल लागून काही दिवस झाले… Entrance ,Exams काही झाल्या, काही अजून बाकी आहेत. आता प्रत्येक घरात एकच प्रश्न — “पुढे काय?”

काही विद्यार्थ्यांचं आधीच ठरलेलं असेल, काही अजून शोधात असतील, आणि काही जण अजूनही “आई-बाबा सांगतील ते” किंवा “मित्र करेल ते” या वाटेवर असतील.

अशा वेळी पालकांची भूमिका खूप मोठी असते. कारण इथून पुढे खरं मुलांचं आयुष्य सुरू होतं. बारावीपर्यंतचं आयुष्य एखाद्या डबक्यासारखं असतं सगळं सीमित, Controlमध्ये पण त्यानंतर त्यांचा प्रवेश एका अथांग महासागरात होतो. हा समुद्र कसा पार करायचा, कोणता मार्ग निवडायचा आणि किनाऱ्यापर्यंत पोहोचायचं कसं हे सगळं त्यांच्यासाठी नवीन असतं.

आणि म्हणूनच, या प्रवासात पालक म्हणून तुमची साथ खूप महत्त्वाची ठरते. कारण हीच ती वेळ असते जिथे मुलं घडतात… किंवा बिघडतात.

आजही बरेच पालक जोशात मुलांची career ठरवतात आणि आपली जबाबदारी संपली असं समजतात. पूर्वी कदाचित ते पुरेसं होतं… पण आता परिस्थिती बदलली आहे, स्पर्धा वाढली आहे. म्हणूनच तुमच्या मुलांचे फक्त आई-बाबा न राहता, त्यांचे मित्र बना. तुमचे निर्णय त्यांच्यावर लादू नका, तर तुमचा दृष्टिकोन त्यांना समजावून सांगा. त्यांची मतं ऐका… त्यांना बोलू द्या.

जर त्यांचा निर्णय चुकत असेल, तर त्यांना थांबवण्यापेक्षा त्यांच्या सोबत ठाम उभं रहा. कारण चुका दाखवायला समाज आहेच.

काही गोष्टी चुकतील, काही निर्णय चुकतील पण त्या वेळी त्यांना प्रेमाने समजावून सांगा, हुकुमशहा बनू नका. नाहीतर नात्यात अंतर वाढत जातं. दररोज त्यांच्याशी बोला… पण पालक म्हणून नाही— मित्र म्हणून पालक आणि मित्र या दोन भूमिकांमध्ये एक बारीक रेघ ठेवा— जी तुम्हाला योग्य वेळी switch करता आली पाहिजे. पूर्ण मोकळीकही नाही, आणि जास्त बंधनही नाही समतोल महत्त्वाचा आहे.

तुमच्या मुलांचा comfort space बना… जिथे ते प्रत्येक गोष्ट तुम्हाला न घाबरता सांगतील. आणि हे तेव्हाच शक्य आहे— जेव्हा तुम्ही त्यांची तुलना करणार नाही, त्यांना समजून घ्याल आणि त्यांना स्वतःचे निर्णय घेऊ द्याल.

शेवटी

तुमच्या मुलांनी कोणती degree घ्यावी हे सांगणारे खूप सापडतील… पण त्या प्रवासात त्यांच्यासोबत चालणं हीच खरी पालकांची जबाबदारी आहे. नुसती admission घेऊन दिलं म्हणजे सगळं संपत नाही तर त्या प्रवासात त्यांचे सहप्रवासी बना.

93 26 36 53 96

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या