विचारधारा
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 14/05/2026 :
शाळेच्या वातावरणात जसा आनंद मिळतो, तसे अनेकदा दुःखही वाट्याला येते. कधी कारणाशिवाय शिक्षकांकडून शिक्षा होते, तर कधी मित्रांमध्ये फजिती होते. आपलेच मित्र किंवा ओळखीचे काहीजण कधीकधी मुद्दाम त्रासही देतात.
जेव्हा आपलीच माणसे त्रास देतात, तेव्हा त्याचा मानसिक त्रास जास्त होतो. ज्यांच्याकडून आपल्याला मदतीची किंवा प्रेमाची अपेक्षा असते, तेच जेव्हा विरोधात वागतात आणि वरून मात्र मैत्रीचा आव आणतात; तेव्हा त्यांचा विश्वास धरणे कठीण जाते. अशा वेळी चीड येते आणि तो विषय मनातून जात नाही.
मुलांनो, अशा प्रसंगी स्वतःला मानसिकदृष्ट्या कणखर ठेवायला शिका. प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव वेगळा असतो. कोणी कसे वागावे हे आपण ठरवू शकत नाही; पण जे चालले आहे त्याकडे दुर्लक्ष करायचे की नाही, हे मात्र आपण नक्कीच ठरवू शकतो.
दुसऱ्याला बदलण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा स्वतःमध्ये बदल घडवणे जास्त सोपे असते.
सौ. स्नेहलता स. जगताप.

0 टिप्पण्या