विचारधारा
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 20/05/2026 :
अनेकदा मित्रांमध्ये गप्पा आणि चर्चा चांगल्याच रंगत असतात. हसत-खेळत, चेष्टा-मस्करी करत तुम्ही एकमेकांची खेचत असता. मात्र, एखाद्याकडून काही अतिरेक झाला, तर क्षणात वादावादी सुरू होते.
हा वाद वाढत गेला, तर कधीकधी मित्र शत्रूमध्ये बदलतात. खरे तर वाद हा दोन व्यक्तींत नसतो, तर तो त्यांच्या मतांमध्ये आणि विचारांमध्ये असतो. त्यामुळे परस्परांमध्ये वितुष्ट आणण्यापेक्षा, आपले विचार पुन्हा एकदा पारखून पाहणे आवश्यक असते.
मुलांनो, कोणतीही गोष्ट सकारात्मकतेने हाताळली, तर त्यामधून बरेच काही शिकायला मिळते. वाद ज्या मुद्द्यावरून झाला, त्यावर शांत मनाने विचार केला तर चूक काय आणि कोणाची, ते लक्षात येते. त्यामध्ये दुरुस्ती देखील करता येते.
मनात कोणतीही अढी न ठेवता, चुकले असेल तर आपली चूक मान्य करून, मैत्री अखंड ठेवूया.
सौ. स्नेहलता स. जगताप.

0 टिप्पण्या