मनाची शुद्धता
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 02/05/2026 :
जीवनात वेळेला फार महत्त्व आहे. कोणतीही गोष्ट वेळेवर करणे महत्त्वाचे असते. काही गोष्टी वेळेपूर्वी करणे जसे चुकीचे ठरते, तसेच वेळ निघून गेल्यावर केल्या तर त्या निष्फळ ठरतात.
प्रत्येक गोष्टीला एक ठराविक कालावधी लागतो आणि त्यासाठी तितका वेळ द्यावाच लागतो; मग ते फुलाचे उमलणे असो वा बाळाचा जन्म असो. अगदी भाकरीसुद्धा लवकर उलटली, तर ती तुटते.
'करू निवांत,' असे म्हणून चालत नाही, कारण काही वेळाने गोष्टी बिघडू शकतात. 'निवांत सवडीने पाणी घालू,' म्हटले तर रोपे जळून जातील. शेवटी, दिवा विझून गेल्यावर त्यात तेल ओतून काय उपयोग?
आजचा संकल्प
वेळेचे महत्त्व समजून घेऊन ज्या गोष्टींना जितका वेळ देणे आवश्यक आहे, तितका वेळ देऊ; तसेच ज्या गोष्टी वेळ निघून जाण्यापूर्वी करणे गरजेचे आहे, त्याही वेळेतच पूर्ण करू.
सौ. स्नेहलता स. जगताप.

0 टिप्पण्या