खा.धैर्यशील मोहिते पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

खा.धैर्यशील मोहिते पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश


वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 27/05/2026 :

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले असून केंद्र सरकारने प्रधानमंत्री ग्राम सडक योजना (PMGSY-IV) अंतर्गत २०२६-२७ च्या पहिल्या टप्प्यात ७.६९ कोटी रुपये खर्चाच्या सांगोला तालुक्यातील चार ग्रामीण रस्ते कामांना मंजुरी दिली आहे.

केंद्रीय ग्रामीण विकास व कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी याबाबतचे पत्र खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांना पाठवून मंजुरीची माहिती दिली आहे.

मंजूर कामे :📍 शेरीमळा ते एसएच-386 (एकतपूर) – 1.60 कि.मी. – ₹177.95 लाख,

📍 कोळवले वस्ती ते अजनाळे – 1.43 कि.मी. – ₹164.28 लाख,

📍 कोळसेवस्ती ते व्हीआर-46 (हंगीरगे) – 1.30 कि.मी. – ₹168.23 लाख,

📍 देशमुख-किसन साळगरे पाटीलवस्ती-गुंडीवस्ती ते व्हीआर-131 (कोळे) – 1.80 कि.मी. – ₹259.03 लाख

✅ एकूण रस्ते लांबी : 6.13 कि.मी.

✅ मंजूर निधी : ₹7.69 कोटी

या रस्ते कामांमुळे ग्रामीण भागातील दळणवळण, शिक्षण, आरोग्य सेवा आणि शेतीमाल वाहतुकीस मोठी चालना मिळणार असून ग्रामीण विकासाला गती मिळणार आहे.

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे माढा मतदारसंघातील विकासकामांना मिळत असलेल्या गतीबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या