कै. नामदेव कोंडीबा पराडे महाराज यांची पुण्यतिथी

वृत्त एकसत्ता न्यूज  

आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 08/05/2026 :

श्री क्षेत्र महादेव मंदिर, महादेव मळा, बाबळगाव (तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर) देवस्थानचे संस्थापक कै. नामदेव कोंडीबा पराडे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त भजन कीर्तन अन्नदान इत्यादी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 12 वा. 05 मिनिटांनी फुलांचा कार्यक्रम होईल. 


शुक्रवार दिनांक 8 मे 2026 रोजी सकाळी महादेव मळ्यातील महादेव मंदिरात आयोजित केलेल्या या पुण्यतिथी सोहळ्या प्रसंगी उपस्थित राहून माळशिरस तालुका काँग्रेस कमिटी चे तालुकाध्यक्ष गिरीश प्रभाकर शेटे, अकलूज वैभव आणि वृत्त एकसत्ताचे संस्थापक संपादक, सेवा जेष्ठ पत्रकार भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे यांचे सह अनेक मान्यवरांनी कै. नामदेव कोंडीबा पराडे महाराज यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.