विचारधारा
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 02/05/2026 :
कालपासून शाळांना सुट्ट्या लागल्या. सर्वजण खुशीत असाल ना? सुट्टीचे नियोजन तर तुम्ही अगोदरच केले असेल. सकाळी निवांत उठणे, चित्रपट पाहाणे, पोहायला जाणे आणि भरपूर खेळणे; असे कितीतरी बेत मनात असतीलच.
सुट्टीत गावी गेलात, तर मोठ्यांच्या मार्गदर्शनाखाली वाहत्या पाण्यात किंवा विहिरीत पोहायला शिका. झाडांवर चढणे, गोट्या खेळणे अशा पारंपरिक खेळांचा आनंद घ्या. ढोल-ताशा, बासरी किंवा तबला अशी वाद्ये वाजवायला शिका.
मुलांनो, या आनंदासोबतच जीवनात उपयोगी पडतील अशा काही जीवनोपयोगी कलाही शिका. जसे की, स्वयंपाक करणे किंवा छोटे-मोठे खाद्यपदार्थ बनवणे, शिवणकाम, विणकाम किंवा बागकाम शिकून घ्या. अगदी सायकलचे पंक्चर काढणे आणि चाकात हवा भरणे, यांसारख्या छोट्या गोष्टीही तुम्हाला स्वावलंबी बनवतात.
लक्षात ठेवा, शिकलेले कधीच वाया जात नाही; ते आयुष्यात कधी ना कधी नक्कीच उपयोगी पडते.
सौ. स्नेहलता स. जगताप.

0 टिप्पण्या