मनाची शुद्धता
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 20/05/2026 :
आपल्या जीवनात नेहमीच चढ-उतार येत असतात. परिस्थिती कधीच कायम राहत नाही, ती सारखी बदलत असते. जशी परिस्थिती बदलते, तशी आपली मानसिकता देखील बदलते.
आपण जेव्हा आनंदात आणि मस्त मजेत असतो, तेव्हा अहंकाराने माणसे तोडू नका. कारण जेव्हा काही अघटित घडते, दुःखद प्रसंग येतात किंवा आर्थिक ओढाताण असते; अशा वेळी हीच माणसे आपल्या उपयोगी पडतात.
आपल्या चेहऱ्यावर कायम शांत आणि समाधानी भाव असावा. बोलण्यात-वागण्यात संयम हवा. लक्षात ठेवा, रात्रीनंतर दिवस येणार असतो आणि पुन्हा रात्र होणार असते.
आजचा संकल्प
सुख-दुःखाचे हे चक्र कायम चालू असते. कोणतीच स्थिती कायम राहत नाही. त्यामुळे येईल ती परिस्थिती धीराने आणि संयमाने हाताळूया आणि नेहमी समाधानी राहण्याचा प्रयत्न करूया._
सौ. स्नेहलता स. जगताप.

0 टिप्पण्या