सहकार महर्षि कारखान्याच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

 

सहकार महर्षि कारखान्याच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 11/05/2026 :

सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखाना लि, शंकरनगर-अकलूज येथे सयाजीराजे संग्रामसिंह मोहिते-पाटील (संचालक शिवसृष्टी किल्ला व शिवछत्रपती मल्टीमेडिया लेझर शो कमिटी व नगरसेवक, नगरपरिषद अकलूज) यांचे शुभहस्ते कारखाना परिसरामध्ये वृक्षारोपण कार्यक्रम सोमवार दि.११/०५/२०२६ रोजी सकाळी १०.३० वा. संपन्न झाला.

कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष सहकार महर्षि कै. शंकरराव मोहिते-पाटील उर्फ काकासाहेब यांनी कारखाना स्थापनेपासून कारखाना परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करुन त्याचे संवर्धन केलेले आहे. त्याचा पर्यावरण समतोल व लाभ आज रोजी या परिसरामध्ये होत आहे. तसेच 

कारखान्याचे मार्गदर्शक संचालक  विजयसिंह मोहिते-पाटील ( माजी उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य) तसेच 

कारखान्याचे चेअरमन  जयसिंह मोहिते-पाटील व संचालिका  स्वरुपाराणी जयसिंह मोहिते-पाटील यांचे नेतृत्वाखाली  सयाजीराजे संग्रामसिंह मोहिते-पाटील यांच्या संकल्पनेतून व प्रेरणेतून जागतिक स्तरावरती वाढत चाललेल्या तापमानाच्या भीषण समस्येस अनुसरुन यावर्षीपासून कारखाना परिसर, कामगार कॉलनी उपलब्ध मोकळ्या विविध जागेमध्ये मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या जातीचे वृक्षारोपन करणेत आले आहे. कारखाना परिसरात यामुळे पर्यावरण पूरक वातावरणाची काळजी व सामाजीक बांधिलकीच्या दृष्टीने या मोहिमे अंतर्गत नियोजनबध्द प्रयत्न सुरु आहेत. साधारणतः कारखाना व केनयार्ड परिसरामध्ये विविध झाडांचे वृक्षारोपन करणेत आलेले असून शेती विभाग कडून याचे नियोनबध्द संगोपन व देखभाल केली जात आहे. तसेच कारखान्याचे विविध ठिकाणचे विभागीय कार्यालय येथे ५ जून पर्यावरण दिनी तसेच या महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करणेचा मनोदय  सयाजीराजे मोहिते-पाटील यांनी व्यक्त केला.

सदर कार्यक्रमप्रसंगी कारखान्याचे सेक्रेटरी अनिल काटे, चिफ अकौंटंट वाय. बी. इनामदार, मुख्य शेतकी अधिकारी आर.एस. चव्हाण, सिव्हील इंजिनिअर एस.ए. शेखर, स्टोअर किपर बी.व्ही. सावंत, आय.टी. मॅनेजर एस. जे. नरसाळे, पर्यावरण अधिकारी पी.एच. इनामदार, लेबर ऑफिसर एस. एम. साळुंखे, परचेस ऑफिसर आर. एस. गायकवाड, गॅरेज इन्जार्ज बी. आर. इनामदार व विविध विभागाचे सेक्शन इन्चार्ज, कामगार संचालक जयवंत माने-देशमुख व युनियन प्रतिनिधी तसेच शेती विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या