अकलूज येथे वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने गुणवंत विद्यार्थींचा सत्कार

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 18/05/2026 :

 येथे वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने मल्लिकार्जुन मंदिरात शनी जयंतीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.त्याच बरोबर वीरशैव लिंगायत समाजातील इयत्ता दहावी व बारावी परीक्षेत सुयश मिळविलेल्या 17 विद्यार्थ्यांचा विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

सकाळी शनी महाराज यांच्या मुर्तींची अभिषेक व महापूजा रविशंकर गुळवे यांच्या हस्ते संपन्न झाली व समाजातील दहावी बारावीच्या परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समाजाच्या वतीने शाल,श्रीफळ,एक वृक्ष व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.यामध्ये बारावीतील पाच व दहावीतील बारा विद्यार्थांचा समावेश होता. यावेळी वीरशैव लिंगायत समाजाचे पदाधिकारी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाच्या शेवटी समाजाच्या वतीने समाज बांधवांसाठी महाप्रसादाची  व्यवस्था करण्यात आली.