मनाची शुद्धता

 

मनाची शुद्धता 

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 07/05/2026 :

सर्वसाधारणपणे आपल्याला माणसे जोडायला आवडते. आता आपले मित्र आहेत, तसेच कॉलेज जीवनातील आणि शालेय जीवनातील बालमित्रही संपर्कात असतात.

नाती जोडणे हे स्वभावावर अवलंबून असते. काहीजण नातलगांशी सुद्धा तुटक वागतात, तर काहीजण अनोळखी लोकांशी सुद्धा खूप आपलेपणाने वागतात. काही लोक फक्त मतलब साधण्यापुरती नाती जोडतात.

स्वार्थापोटी जवळ आलेली नाती जास्त काळ टिकत नाहीत; काम झाले की असे लोक दूर होतात. मात्र, आपुलकीने जवळ आलेले लोक शेवटपर्यंत कोणताही स्वार्थ न पाहता नाती निभावतात.

आजचा संकल्प 

जोडलेली नाती टिकवण्यासाठी आपलेपणा आणि निःस्वार्थ भाव ठेवू. संघर्षाचा कोणताच विषय मनात न ठेवता एकमेकांशी संवाद साधू आणि स्वच्छ मनाने नाती जपू.

सौ. स्नेहलता स. जगताप.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या