आवटे (सय्यद) 卐 मुलाणी शुभ विवाह थाटाने संपन्न
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 12/05/2026 :
सय्यदगफुर रमजान आवटे (सय्यद) यांचे नातू जोहर सय्यदगफुर आवटे (सय्यद)यांचे चिरंजीव डॉ. शहाबाज जोहर आवटे (सय्यद)(BDS,MDS) आणि कै.महंमद बापूभाई मुलाणी यांची नात शेखलाल महमद मुलाणी यांची मुलगी चि.सौ.का. डॉ.हिना शेखलाल मुलाणी (MBBS MS) यांचा शुभविवाह रविवार दिनांक 10 मे 2026 रोजी सायंकाळी अत्यंत थाटाने संपन्न झाला.
वाघ पॅलेस इंदापूर जिल्हा पुणे या ठिकाणी झालेल्या या विवाह सोहळ्याप्रसंगी उभयपक्षाकडील सर्व क्षेत्रातील सर्व स्तरातील दिग्गज मान्यवरांनी उपस्थित राहून नव वधू वरांना शुभाशीर्वाद दिले. उपस्थितांचे स्वागत आणि सन्मान आवटे (सय्यद) आणि मुलाणी परिवाराच्यावतीने करण्यात आला.
सोमवार दिनांक 11 मे रोजी रात्री अकलूज येथील कृष्णप्रिया मल्टीपर्पज फंक्शन हॉलमध्ये लग्ना निमित्त रिसेप्शन पार्टी चे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ज्येष्ठ डॉक्टर जवंजाळ, यशराज गिरीश शेटे, माळशिरस तालुका काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष गिरीश प्रभाकर शेटे, अकलूज वैभव आणि वृत्त एकसत्ता चे संस्थापक संपादक सेवा जेष्ठ पत्रकार भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे यांनीही नवदांपत्यांना शुभेच्छा दिल्या.

0 टिप्पण्या