मनाची शुद्धता

 

मनाची शुद्धता 

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 22/05/2026 :

आयुष्यात आपल्या प्रत्येकावर कोणत्या ना कोणत्या प्रकारची जबाबदारी असते. कधी ती स्वखुशीने स्वीकारली जाते, तर कधी ती अचानक येऊन पडते. काही वेळेस तर नाईलाजाने देखील जबाबदारी अंगावर घ्यावी लागते.

कधी कोणाला मानसिक आधार द्यावा लागतो, तर कधी आर्थिक. कोणाच्या शिक्षणाची जबाबदारी घ्यावी लागते, तर कधी कोणाच्या सर्वच जबाबदाऱ्या आपल्यावर येऊन पडतात. कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडताना अनेकांचे संपूर्ण आयुष्य त्यातच निघून जाते.

ज्यांच्यावर अशा जबाबदाऱ्या असतात, अशा लोकांचे जीवन कष्टात आणि काटकसर करण्यात जाते. त्यांचे जीवन एका चाकोरीबद्ध पद्धतीचे असते; हौस-मौज किंवा चैन या गोष्टी त्यांच्याकडून क्वचितच केल्या जातात. अशा व्यक्ती एक अतिशय सरळ-साधे जीवन जगतात. 

 आजचा संकल्प 

आपण प्रत्येक जण आपले जीवन एक जबाबदार नागरिक म्हणून जगत असताना, नेहमी माणुसकीने 'माणसाशी माणसासारखे' वागूया आणि आपण एक संवेदनशील माणूस आहोत हे आपल्या कृतीतून सिद्ध करूया.

सौ. स्नेहलता स. जगताप

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या