हाजी हाफिज फतेह मोहम्मद जोधपुरी मस्जिद राऊतनगर अकलूज यांच्यावतीने यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे / शकूर तांबोळी
अकलूज दिनांक 18/05/2026 :
हाजी हाफिज फतेह मोहम्मद जोधपुरी मस्जिद राऊतनगर अकलूज यांच्यावतीने दहावी व बारावीतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार, सन्मान करण्यात आला.
प्रास्ताविकात प्रा. शेरखान पठाण म्हणाले की शिक्षणाने माणूस शहाणा होतो, शिक्षण अन्याय अत्याचार खपवून घेत नाही, यशस्वी विद्यार्थ्यांनी अपार कष्ट घेऊन उच्चांकी गुण मिळवले आहेत. ते नक्कीच मोठ्या पदापर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाहीत.
यावेळी बोलताना मस्जिदचे सचिव युन्नूस तांबोळी म्हणाले की दहावी बारावीचे विद्यार्थी विशेष प्राविण्यासह यशस्वी झाले. कौतुकास्पद आहे. सत्कार विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी बळ देणार आहे.जो विद्यार्थी आत्मपरीक्षण करून अभ्यास करतो. तो नक्कीच यशस्वी ठरतो. जीवनात यशस्वी होण्यास होण्यासाठी परिश्रमाची गरज आहे. परिश्रमाशिवाय काहीही साध्य होणार नाही, यासाठी विद्यार्थ्यांनी इतरत्र लक्ष न घालता केवळ अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करून यशस्वी व्हावे. स्पर्धा परीक्षेत यशस्वी व्हावे.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मस्जिदचे माजी अध्यक्ष दस्तगीर शेख, शागीर सय्यद, सलीम सय्यद, अलीमखान पठाण, सलीमखान पठाण, एडवोकेट शब्बीर जमादार, जुहूर सय्यद, आसिफ मुसा शेख, मोहसीन मुजावर,फारूक बागवान, अकबर शेख, मुसाभाई शेख, शब्बीर शेख, सनी शेख, हुसेन मुल्ला,बाबूलाल तिकोटे, आदींनी परिश्रम घेतले.
यावेळी अल-फतहा मस्जिदचे अध्यक्ष हमीद मुलाणी, सामाजिक कार्यकर्ते हसन बागवान,समीर बागवान, अलीम तांबोळी, सरफराज सय्यद, सलीम मुलाणी, मोहम्मद शेख,अतीक् शेख, समीर तांबोळी,प्रा. शानुरखान पठाण, रहीम सय्यद, पालक वर्ग उपस्थित होते. माळशिरस तालुक्यातील जवळजवळ 40 गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मस्जिदच्या वतीने करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मौलाना अब्दुलवाहीद पठाण यांनी केले.

0 टिप्पण्या