विचारधारा
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 07/05/2026 :
पक्ष्यांची घरटी कधी पाहिलीत का? चिमणीची, कावळ्याची, सुगरणीची... ती कशी असतात आणि कुठे असतात? शिंपी पक्ष्याचे घरटे तर किती छान असते!
पक्ष्याना हात नसतात. काडी-काडी चोचीत धरून आणतात आणि झाडाच्या छोट्याशा फांदीला त्यांची टांगती घरे बांधतात. ती घरे फक्त त्या ऋतू (सिझन) पुरतीच असतात. त्यामध्ये ते पिल्ले उबवतात. पंखांत बळ आले की पिल्ले उडून जातात आणि घरटे मोकळे पडते. पुढील ऋतूमध्ये पुन्हा नवे घरटे!
मुलांनो, पक्षी न थकता किती कष्ट करतात, ना कंटाळतात ना वैतागतात! त्यांच्याकडून शिकण्यासारखे किती आहे ना आपल्याला? काय नाही यापेक्षा, जे आहे त्याचा उपयोग करून गरज पूर्ण करता आली पाहिजे.
कोणाकडून काय शिकायचे, हे लक्षात घेतले तर अगदी, पशु पक्षी, कीटक सुद्धा आपला गुरु होऊ शकतात.
सौ. स्नेहलता स. जगताप.

0 टिप्पण्या