विचारधारा

 


विचारधारा

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 03/05/2026 :

आता उन्हाळी सुट्ट्या सुरू होतील. तुम्ही नक्कीच कुठे ना कुठे फिरायला जाण्याचे नियोजन केले असेल. फिरायला जाताना अनेक मुले वॉटर पार्क किंवा मॉलला पसंती देतात; पण या सुट्टीत आपल्या महाराष्ट्राचा देदीप्यमान ऐतिहासिक वारसा असलेले गड-किल्ले पाहायला नक्की जा.

हे किल्ले म्हणजे केवळ दगडधोंड्यांच्या भिंती नाहीत, तर तो आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाचा इतिहास आहे. शिवरायांच्या चरणांनी पावन झालेल्या या भूमीमध्ये गेल्यावर एक वेगळीच ऊर्जा मिळते. तिथे केल्या जाणाऱ्या ट्रेकिंगमुळे शारीरिक व्यायाम तर होतोच, पण त्यासोबतच कठीण परिस्थितीतून मार्ग काढण्याची जिद्दही निर्माण होते.

मुलांनो, गडावर गेल्यावर तिथले पावित्र्य राखा. तिथे कचरा करू नका किंवा भिंतींवर काहीही लिहू नका. हे किल्ले जपण्याची जबाबदारी आता आपल्या सर्वांची आहे.

सौ. स्नेहलता स. जगताप.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या