विचारधारा

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 31/05/2026 :

आपले आरोग्य चांगले असेल, तर आपली मानसिकता देखील नेहमी उत्तम राहते. त्यासाठी आपला आहार-विहार आणि सकारात्मक विचार अत्यंत महत्त्वाचे असतात. शारीरिक आरोग्य जेव्हा चांगले असते, तेव्हा आपली बौद्धिक क्षमता पण उत्तम प्रकारे कार्य करते.

अनेकदा शरीरयष्टी खूपच बारीक किंवा कृश असेल, तर बौद्धिक क्षमता चांगली असूनही ती प्रगतीच्या आड येऊ शकते. याउलट, प्रमाणापेक्षा जास्त वजन असणे हे सुद्धा आरोग्यासाठी अजिबात चांगले नसते.

मुलांनो, यासाठी नियमित व्यायाम करा आणि घरातील पौष्टिक जेवण घ्या. बाहेरचे पिझ्झा-बर्गर खाल्ल्याने जरी तुमच्या जिभेचे लाड होत असले, तरी त्यामुळे पोटाचे आरोग्य बिघडते. बाहेरची कृत्रिम थंड पेये घेण्यापेक्षा, घरी प्रेमाने केलेले लिंबू, कोकम, आवळा सरबत किंवा कैरीचे पन्हे पिणे कधीही अधिक योग्य!

बाहेरचे उघड्यावरील किंवा पॅक केलेले पदार्थ खाऊन आरोग्य कधीच चांगले राहत नाही, हे वेळीच लक्षात घ्या आणि आपले शरीर व आरोग्य मनापासून जपा.

सौ. स्नेहलता स. जगताप.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या