मनाची शुद्धता
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 27/05/2026 :
जीवनात संघर्ष हा असतोच. जन्माला येताना संघर्ष अटळ असतो. पुढे रांगणे, उभे राहणे, चालणे, या आणि अशा कृती करताना संघर्ष करावा लागतो; त्यामधूनच प्रगती होते.
शारीरिक संघर्ष असतो, तसा मानसिक, भावनिक, आर्थिक संघर्षांना पण सामोरे जावे लागते. जेव्हा संघर्ष करावा लागतो, तेव्हा मनाने खचल्यासारखे होते. क्वचित नकारात्मक विचारांनी वैफल्य येते.
मात्र, प्रयत्नवादी राहिले तर मार्ग निघतो. पाणी प्रवाही राहिले तर नदीच्या स्वरूपात पुढे-पुढे जात राहते. वाहत असताना दगड-धोंडे, खाच-खळगे, वेडीवाकडी वळणे आली, तरी ते थांबत नाही, हे उदाहरण डोळ्यांसमोर ठेवले की संघर्ष कसा हाताळावा, हे लक्षात येते.
आजचा संकल्प
आपल्या जीवनात कितीही संघर्षाचे प्रसंग आले, तरी निसर्गाला गुरुस्थानी ठेवूया. "थकला तो संपला!" हे लक्षात घेऊया आणि सकारात्मक राहून प्रयत्न करत राहूया.
सौ. स्नेहलता स. जगताप.

0 टिप्पण्या