🟪तामीळनाडूतील क्रांती-प्रतिक्रांती

💢संघ-भाजपाचे 2026 चे गारदीः बंगालमध्ये हुमायु व तामीळनाडूत विजय! (भाग-3)

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 28/05/2026 :

फेसबुक मित्राच्या स्टॅलिनवरील पोस्टमधील पुढील एक वाक्य ह्रृदयाला पीळ पाडणारे आहे-

‘‘इतकं करूनही एखाद्या माणसाचा पराभव होत असेल तर त्याने नक्की करावं तरी काय, हा सामान्य माणूस म्हणून मला पडलेला प्रश्नच आहे.’’

पुढील वाक्य तर संवैधानिक व लोकशाही मार्गांवरचा विश्वास उडवणारे आहे-

‘‘गेल्या ५ वर्षांत जे काम केलं त्यानंतरही पराभव होणार असेल तर मग एखाद्या मुख्यमंत्र्याने आणखी काय करणं अपेक्षित आहे, हे कळत नाही...’’

स्टॅलिनने व त्यांच्या पक्षाने मुख्यमंत्री म्हणून जी 15-16 क्रांतीकारक कामे केलेली आहेत, त्यांची निवडक नोंद आपण लेखाच्या दुसर्‍या भागात घेतलेली आहे. फुले शाहू आंबेडकर व लोहिया यांच्या नावाने मतांचा जोगवा मागणारे बरेच मुख्यमंत्री या देशात होउन गेलेत व अजूनही होत आहेत, परंतू यापैकी अशा एखाद्या मुख्यमंत्र्याचे नाव सांगा ज्याने स्टॅलिनप्रमाणे एक तरी काम केलेले आहे. बरेच मुख्यमंत्री दलित की बेटी, बाबासाहब का बेटा अशी सहनुभुती मिळवीत मते मागतात व मुख्यमंत्री झाल्याबरोबर संघ-भाजपाशी युती करतात व बाबासाहेबांच्या हाथीला ब्राह्मणांचा गणेश बनविण्याचे काम करतात. ‘‘पिछडा पावे सौ मे साठ’’ असे ब्रीद वाक्य घेउन काम करणार्‍या समाजवादी लोहियांचे अनेक लालू-मुलायमसारखे अनुयायी मुख्यमंत्री झालेत, परंतू पिछडा ओबीसींना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देणारा एकही मुख्यमंत्री ना समाजवाद्यांमधून निपजला ना फुलेआंबेडकरवाद्यांमधून निपजला! सामी पेरियारवादच असे क्रांतीकारी मुख्यमंत्री निपजू शकतो, हाच मुद्दा वारंवार सिद्ध होतो. ओबीसी मुख्यमंत्री नितीश कुमारने ओबीसींचे आरक्षण लोकसंख्येच्या प्रमाणात वाढवायचा प्रयत्न केला, त्यासाठी त्यांनी आपल्या बिहार राज्यात जीवाची बाजू लावून जातनिहाय जनगणनाही केली. भाजपाशी दोस्ती करुन सत्ता भोगत असतांना ते तुम्हाला अशी क्रांतीकारी कामे करु देणारच नाहीत, किंबहुना संघ-भाजपाचे ब्राह्मण नाराज होतील या भीतीपोटी तुमच्या मनात क्रांतिकारी विचार येउच शकत नाहीत, हे बहन मायावतीजींनी सिद्धच केले आहे.

नीतीश कुमार याबाबतीत हुशार ठरलेत. संघ-भाजपाच्या आशिर्वादाने एखादा दलित-ओबीसी मुख्यमंत्री होऊ शकतो, प्रधानमंत्रीही होऊ शकतो, परंतू जातनिहाय जनगननेसारखा क्रांतीकारी निर्णय घेतल्यावरही त्याची अमलबजावणी तो दलित-ओबीसी मुख्यमंत्री करू शकत नाही. याचा अनुभव नीतीश कुमारने घेतला आणी केवळ जातनिहाय जनगणना करण्यासाठी नीतीशने भाजपाला लाथ मारून लालू प्रसाद यादवांशी युती केली व जातनिहाय जनगनना अनेक न्यायालयीन अडथळ्यांवर मात करीत पूर्ण केली.

तामीळनाडूच्या विजयची कथा काय सांगते? पश्चिम बंगालमध्ये संघ-भाजपाने जे घडवुन आणले तेच तामीळनाडूमध्येही घडले. प. बंगालमध्ये हुमायु कबीर नावाच्या मुसलमानाने बाबरी मशिद बांधण्याचा निर्धार केला आणी तो एका रात्रीतून मुसलमानांचा नेता बनला. त्याला बाबरी मशिद बांधण्यासाठी व ममता बॅनर्जींच्या पक्षाच्या विरोधात निवडणूका लढविण्यासाठी संघ-भाजपाने 1,000 कोटी दिल्याची क्लीप इंटरनेटवरून व्हायरल होताच MIM च्या ओवेशींनी त्याच्याशी असलेली निवडणूक युती तोडली. परंतू परिणाम जो व्हायचा तो झालाच! EVM, SIR, हुमायू व ओवेसी या चौघांचा एकत्रीत परिणाम म्हणजे ममता बॅनर्जींचा प्रचंड मोठा पराभव व हुमायू कबीरचा दोन्ही मतदारसंघातील विजय! एवढी घुसळण केल्यावर जे सत्तेचे लोणी निघाले ते अर्थातच संघ-भाजपाने पळविले.

ममता बॅनर्जी व त्यांच्या पक्षाला पराभूत करण्यासाठी संघ-भाजापाचे ब्राह्मण हुमायू कबीर नावाच्या मुसलमानाला एक हजार कोटी रूपये देऊ शकतात तर स्टॅलिनचा व स्टॅलिनच्या पक्षाचा पराभव करण्यासाठी विजयला किती हजार करोड दिले असतील, याचा अंदाज करणे कठीण नाही. पश्चिम बंगालमध्ये तामीळनाडूप्रमाणे कोणतीही क्रांतीकारी विचारधारा राजकारणात नाही. ममता व त्यांचा पक्ष गांधीवादी ब्राह्मणी-भांडवलदारी पक्ष आहे. तरीही तेथील ब्राह्मणी-भांडवली पक्षाचा पराभव करण्यासाठी ब्राह्मणी संघ-भाजपाने एक हजार करोड रूपये हुमायु मुसलमानाला दिलेत, तर विचार करा क्रांतीकारी-अब्राह्मणी सामी पेरियारवादाला तामीळनाडूच्या सत्तेतून हद्दपार करण्यासाठी किती हजार करोड रूपये विजयला दिले असतील?

या आधी संघ-भाजपाने असे प्रयत्न अनेकदा केलेत, मात्र ते सपशेल अपयशी ठरलेत. तामीळनाडूची जनता सिनेमावेडी आहे, असा (गैर)समज करून घेउन संघ-भाजपाने सर्वप्रथम रजनीकांत या सुपर स्टारला राजकारणात ‘बाहुला’ म्हणून नाचवला. रजनीकांतने 2017 साली स्वतःच्या नावाने सामाजिक संघटना (Rajani Makkal Mandram) स्थापन केली व राजकारणात येत असल्याचे सुतोवाच केले. राजकारणाच्या उद्देशाने स्थापन केलेल्या अशा सामाजिक संघटना सामाजिक कामासाठी नसतात तर त्या मदतीच्या नावाखाली लोकांना पैसे वाटण्यासाठी असतात. रेवडी (पैसे) देउन मते मिळविणे हाच एकमेव उद्देश या सामाजिक संघटनांचा असतो. समाजकार्याच्या नावाने रजनीकांतने करोडो रूपये वाटले. अर्थात राजकीय महत्वाकांक्षी लोक कधीही स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करुन राजकारण करीत नाहीत. रजनीकांतलाही हुमायू मुसलमानाप्रमाणे करोडो रूपये दिले असणार यात शंका घेण्याचे कारण नाही. नंतर रजनीकांतने Makkal Sevai Katchi नावाचा पक्ष स्थापन केला व 2021 च्या निवडणुका लढण्याची घोषणा केली. परंतू रजनीकांतला संघ-भाजपाचे ब्राह्मणी षडयंत्र लक्षात आले असावे किंवा पेरियारवादी जनतेचा अंदाज आला असावा किंवा संघ-भाजपाशी केलेला करार (Deal) बिघडला असेल, कारण कोणतेही असो रजनीकांतने 2021 च्या निवडणूकांआधीच आपला पक्ष व संघटना बरखास्त केलेत व राजकारणाचा कायमस्वरूपी त्याग केला.

रजनीकांतनंतर संघ-भाजपाने दुसरा बळीचा बकरा शोधला. कमल हासन नावाचा सुपर स्टार! तोही रजनीकांतच्याच मार्गाने पुढे जातो आहे. त्याने पक्ष स्थापन केल्यानंतर निवडणूका लढविण्याच्या अनेक घोषणा केल्यात. 2021 पासून अनेक निवडणूका झाल्यात, मात्र अजून कमल हासन साधी नगरपालिकेची निवडणूकही लढू शकलेला नाही. सिनेमा स्टारची ही दोन्ही षडयंत्रे सपशेल निकामी ठरलीत याचे खरे कारण संघ-भाजपाने शोधून काढले! काय आहे नेमके कारण, आणी त्यातुन संघ-भाजपा काय शिकला?

कोणतेही तत्वज्ञान हे भुतकाळाच्या अभ्यासातून वर्तमानकालीन व भविष्यकालीन समस्यांची उत्तरे शोधण्यासाठी मार्गदर्शन करीत असते. मात्र ब्राह्मणी तत्वज्ञान हे असे एकमात्र तत्वज्ञान आहे जे प्रत्यक्ष ठेंच लागल्यावरच पुढे सरकत असते. ब्राह्मणी तत्वज्ञान हे पाठीमागून ‘धक्कामार’ तत्वज्ञान आहे. रजनीकांत व कमल हासन या दोन ठेंचा लागल्यानंतर संघ-भाजपाच्या असे लक्षात आले की, तामीळनाडूची जनता सिनेमा-वेडी नाही. तामीळनाडूच्या जनतेने करूनानिधी, रामचंद्रन व जयललिता यांना डोक्यावर घेतले व अनेकवेळा मुख्यमंत्रीही केले. करूनानिधी, रामचंद्रन व जयललिता हे सेनेमा सृष्टीतील दिग्गज होते म्हणून तामीळनाडूच्या जनतेने त्यांना डोक्यावर घेतले का, तर अजिबात नाही. तसे असते तर आज विजयच्या जागी रजनीकांत वा कमल हासन मुख्यमंत्री दिसले असते. कारण रजनीकांत व कमल हासन हे दोघे विजयपेक्षा हजार पटीने मोठे सुपरस्टार आहेत व बॉलिवूडने त्यांना अखिल भारतीय सुपरस्टार बनविले आहे. विजयचा एकतरी सिनेमा आहे का बॉलिवूडमध्ये? करूणानिधी, रामचंद्रन व जयललिता हे तिघे अत्यंत प्रमाणिकपणे सामी पेरियारवादी होते म्हणून तामीळनाडूच्या जनतेने त्यांना अनेकवेळा मुख्यमंत्री केले. तामीळनाडूच्या जनतेला उच्च पातळीवरची वैचारिक मानसिकता आहे. आणि ही मानसिकता पेरियारवादाने निर्माण केली व पेरियारवादी राजकारणाने ती अधिक घट्ट केली. पेरियारवादाला नेस्तनाबूत करण्यासाठी दुसर्‍या एखाद्या पुरोगामी परंतू पेरियारवादाच्या तोडीच्या तत्वज्ञानाचा वापर करावा लागेल, हे संघ-भाजपाच्या ब्राह्मणांना लक्षात आले. लोहे को लोहा कांटता है, या न्यायाने संघ-भाजपाने विजयच्या हातात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो दिला आणी विजयचे जातीअंताकडून जातवादाकडचे राजकारण सुरू झाले.

विजयच्या हातात फक्त बाबासाहेबांचा फोटो दिला, विचार नाही दिलेत. भारतात जात-जाणिवा निर्माण करण्यासाठी व जातीय ईगो जागृत करण्यासाठी फक्त फोटो, पुतळे, हार-तुरे व जयजयकार एवढे पुरेसे असते. विजयला कोणताही वैचारिक इतिहास नाही. फक्त फोटो घेउन फिरला आणी काम झाले.

तामीळनाडूमध्ये सर्व जाती-धर्मांच्या जनतेला लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण व शासन-प्रशासनात सहभाग मिळतो. त्यामुळे जाती-जातीत व धर्मा-धर्मांत दंगली घडवून आणण्याचे ब्राह्मणी षडयंत्र तेथे कधीच यशस्वी होऊ शकत नाही. मात्र केवळ समान सवलती व शासन-प्रशासनात समान सहभाग दिल्याने जातीव्यवस्था नष्ट होत नाही, त्यामुळे फक्त जाती-जातीतला व धर्मा-धर्मातला संघर्ष थांबतो. मात्र जोपर्यंत जातीव्यवस्था जीवंत आहे तोपर्यंत जात-जाणीवा जीवंतच राहतात. या जात जाणीवांचाच (दुरू)पयोग संघ-भाजपाने करायचे ठरविले व त्यात ते यशस्वी झालेत.

तामीळनाडूत सामी पेरियारवादी राजकारण 60 वर्षांपासून सत्तेत आहे. शेकडो वर्षांपासुनची घट्ट झालेली कर्मठ व जरठ जातीव्यवस्था 60-70 वर्षात नष्ट करणे अशक्य आहे. ज्याप्रमाणे जातीव्यवस्था टप्प्या-टप्प्याने व शास्त्रीय पद्धतीने अस्तित्वात आली, त्याचप्रमाणे तीला नष्ट करण्यासाठीसुद्धा अनेक टप्पे पार पाडावे लागतील व त्याचे शास्त्रीय तत्वज्ञानही विकसित करावे लागेल. परंतू तुम्ही जातीअंताकडचे टप्पे पार करित असतांना ब्राह्मणवादी छावणी तुमची गंमत बघत शांत बसणार नाही. ती तुम्हाला मध्येच एखाद्या टप्प्यावर गाठेल आणी तुम्हाला गारद करेल. त्याप्रमाणे संघ-भाजपाच्या ब्राह्मणी छावणीने ‘गारदी’ शोधला, त्याला सुपारी दिली आणी जातीअंताकडे जाणार्‍या पेरियारवादी राजकारणाचा घात झाला. असे समाजविघातक गारदी संघ-भाजपाने प्रत्येक राज्यात निर्माण करून ठेवलेले आहेत. महाराष्ट्राच्या जनतेलाही आपला गारदी कोण हे माहित झाले आहे.

पेरियारवादी क्रांतीकारक राजकारणाचा घात केल्यावर विजयची ब्राह्मणी प्रतिक्रांतीची ‘घोडदौड’ कशी सुरू झाली आहे, तीचा आढावा आपण पुढील चौथ्या भागात घेउ या!

प्रा. श्रावण देवरे              

ओबीसी राजकीय आघाडी,                                         Mobile- 81 77 86 12 56   

 

=====================

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या