12 मे रोजी पुण्यात प्रा.डॉ. धनंजय होनमाने लिखित 'संत जनाबाई: शोघ आणि तत्वचिंतन ' ग्रंथाचा प्रकाशन सोहळा
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 07/05/2026 :
मंगळवार दिनांक 12 मे 2026 रोजी पुण्यात प्रा.डॉ. धनंजय होनमाने लिखित 'संत जनाबाई: शोघ आणि तत्वचिंतन ' ग्रंथाचा प्रकाशन सोहळा खासदार शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे.
संत नामदेवांनी इ.स. १२८९ कार्तिक शुद्ध एकादशीला चंद्रभागेच्या वाळवंटात भागवत धर्माचा ध्वज उभारला प्रचलित वर्ण्यभेद व लिंगभेद बाजूला सारून आध्यात्मिक लोकशाही स्थापन केली. त्यामुळे तत्कालीन काळात उच्च-निच जातीतील काही स्त्री-पुरुष आपल्या आचारधमनि व स्वतच्या आत्मप्रकटीकरणाने संत पदापर्यंत पोहोचले. वारकरी संतांच्या मांदियाळीत अतिहीन समजल्या आणाऱ्या मातंग जातीत जन्मलेल्या संत जनाबाईनी आपल्या शुद्ध भक्तिभावाने व निर्भीड आत्मप्रकटीकरणाने स्त्री संत म्हणून स्वतःचे अस्तित्व सिद्ध केले. नामयाची दासी म्हणून स्वतःचा गौरवाने उल्लेख करणाऱ्या संत जनाबाईचे अभंग केवळ भक्तीचे हुंकार नसून ते तत्कालीन सामाजिक, सांस्कृतिक आणि स्त्री अस्तित्वाच्या जाणिवांचे प्रगल्भ प्रकटीकरण आहेत प्रा. (डॉ.) धनंजय होनमाने लिखित 'संत जनाबाई: शोघ आणि तत्वचिंतन 'हा ग्रंथ म्हणजे संत जनाबाईच्या चरित्राचा आणि विचारांचा घेतलेला एक धाडसी, वस्तुनिष्ठ आणि संशोधनात्मक मागोवा आहे. आजवर संत जनाबाईचे जे चरित्र आपण ऐकत किंवा वाचत आलो आहोत ते बहुतांश दंतकथा, आख्यायिका, चमत्कार आणि भावनिक आख्यायिकांवर आधारलेले आहे. 'नाम्याची दासी या बिरुदावलीमुळे संत जनाबाईकडे केवळ संत नामदेवांच्या घरातील एक दासी म्हणून पहिले गेले. परंतु डॉ. धनंजय होनमाने यांनी प्रचलित समजुतींच्या पलीकडे जावून संत जनाबाईचे मुळ अस्तित्व शोधण्याचा प्रयन्त 'संत जनाबाई: शोध आणि तत्वचिंतन या ग्रंथात केला आहे.
प्रस्तुत ग्रंथाचा प्रकाशन सोहळा मंगळवार दि.१२ मे २०२६ रोजी दु. ३ वाजता लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सभागृह, धनकवडी, पुणे येथे खासदार शरद पवार यांच्या शुभ हस्ते व जेष्ठ साहित्यिक प्रा.रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत आहे. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ह.भ.प. बापूसाहेब देहूकर व जस्ट साहित्यिक श्रीपाल सबनीस आहेत तर ग्रंथावर भाष्य करण्यासाठी प्रा. डॉ. विश्वनाथ शिंदे व प्रा.डॉ. आशालता कांबळे आहेत त्याच बरोबर सदर ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्यासाठी महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील मान्यवर महाराज मंडळी व साहित्यिक मंडळी उपस्थित राहणार आहेत. हा ग्रंथ शब्दालय प्रकाशन श्रीरामपूर, वारकरी, फडकरी व दिंडी संघटना, विवेकवर्धिनी चारीतेब्ल ट्रस्ट मा. शरद भाऊ लाड युवा मंच च्या वतीने प्रकाशित होत आहे. तरी या प्रकाशन सोहळ्यासाठी आपण उपस्थित राहावे अशी माहिती समारंभाचे स्वागताध्यक्ष क्रांती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शरदभाऊ लाड यांनी दिली.

0 टिप्पण्या