🛑 OBC हक्कांसाठी काँग्रेसची लढाई सुरूच; जातीनिहाय जनगणना, समान प्रतिनिधित्व आणि महिला आरक्षणात OBC महिलांना ‘कोट्यात कोटा’ द्या” — यशपाल भिंगे
🟦 सोलापुरात काँग्रेस OBC विभागाची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न
भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे
सोलापूर, दि. २४ एप्रिल २०२६ : सोलापूर शहर व जिल्हा काँग्रेस OBC विभागाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक काँग्रेस भवन सोलापूर येथे उत्साहात पार पडली. ही बैठक माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि सोलापूरच्या खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या OBC विभागाचे प्रदेशाध्यक्ष यशपाल भिंगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस सोलापूर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष सातलिंग शटगार, शहराध्यक्ष चेतन नरोटे, OBC विभागाचे प्रदेश सचिव व माळशिरस तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष गिरीश प्रभाकर शेटे, OBC जिल्हाध्यक्ष राजेंद्र रूपनवर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीत OBC समाजाचे प्रश्न, आरक्षण, राजकीय सहभाग आणि भविष्यातील संघटनात्मक रूपरेषा या मुद्द्यांवर सखोल चर्चा करण्यात आली. विशेषतः महिला आरक्षणात OBC महिलांसाठी स्वतंत्र कोटा लागू करण्याच्या मागणीवर ठाम भूमिका घेण्यात आली. तसेच या संदर्भात पुढील धोरण आणि कृती आराखड्यावरही विस्तृत विचारमंथन करण्यात आले.
यावेळी बोलताना OBC विभागाचे प्रदेशाध्यक्ष यशपाल भिंगे यांनी काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, काँग्रेस पक्ष OBC समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय हक्कांसाठी सातत्याने लढत असून काँग्रेसचे नेते खासदार राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली OBC चें प्रश्न अधिक प्रभावीपणे मांडले जात आहेत.
काँग्रेसची भूमिका मांडताना त्यांनी देशात सर्वसमावेशक जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी पुन्हा ठळकपणे मांडली आहे. जितकी लोकसंख्या तितका हक्क या तत्त्वावर OBC समाजाला न्याय्य प्रतिनिधित्व देणे, शिक्षण, नोकरी आणि राजकारणात OBC आरक्षण बळकट करणे, तसेच महिला आरक्षण विधेयकात OBC महिलांसाठी ‘आरक्षणामध्ये आरक्षण’ देण्याची मागणी राहुलजी गांधी यांनी केली.
तसेच OBC समाजाच्या आर्थिक आणि सामाजिक उन्नतीसाठी विशेष योजना राबवण्याची गरज व्यक्त करताना, देशातील OBC समाजाची लोकसंख्या सुमारे 60 टक्के असल्याचे नमूद करण्यात आले. अशा परिस्थितीत त्यांच्या हक्कांकडे दुर्लक्ष करणे अन्यायकारक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यशपाल भिंगे यांनी पुढे सांगितले की, OBC समाजातील लहान घटकांपर्यंत पोहोचून त्यांना संघटित करण्याची आवश्यकता आहे. “लहान घटकांना एकत्र आणून संघटनेची ताकद वाढवली पाहिजे. काँग्रेस आणि राज्यघटनेचा विचार एकच आहे,” असे ते म्हणाले.
यावेळी त्यांनी भाजप सरकारवर टीका करताना OBC समाजाचा आवाज दडपला जात असल्याचा आरोप केला. तसेच राहुलजी गांधी हे देश, लोकशाही आणि राज्यघटना वाचवण्यासाठी सामाजिक न्यायाची लढाई लढत असून या लढ्यात सर्वांनी एकजूट होण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष चेतन भाऊ नरोटे, माजी नगरसेवक रियाज हुंडेकरी, एन के क्षीरसागर, भारतीताई ईप्पलपल्ली, महिला अध्यक्ष प्रमिलाताई तूपलवंडे, ओबीसी विभागाचे प्रदेश सचिव व माळशिरस तालुका काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष गिरीश प्रभाकर शेटे, ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र रुपनर, ब्लॉक अध्यक्ष उदयशंकर चाकोते, लक्ष्मीकांत साका, प्रा. सिद्राम सलवदे, सेवादल अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे, भटक्या विमुक्त विभागाचे अध्यक्ष युवराज जाधव, जिल्हाध्यक्ष लक्ष्मण भोसले, सेवादल यंग ब्रिगेड अध्यक्ष विवेक खन्ना, असंघटित कामगार सेल अध्यक्ष सुभाष वाघमारे, शहर उत्तर सोशल मीडिया प्रमुख सुनील सारंगी, उपाध्यक्ष अंबादास गुत्तीकोंडा, रामसिंग आंबेवाले, हासिब नदाफ, जिल्हा उपाध्यक्ष मोतीराम चव्हाण, अशोक कलशेट्टी, कोमारो सय्यद, राजू अलकोड, सागर उबाळे, संजय गायकवाड, अय्याज आळंद, भीमराव शिंदे, नूरअहमद नलवार, सलिम मणुरे, माजी महिला अध्यक्ष अँड. करीमुनिसा बागवान, सुमन जाधव, विणाताई देवकते, मुमताज तांबोळी, खुद्रेस मनियार, ज्योती गायकवाड, निशा मरोड, कृष्णदेव वाघमोडे, दत्तात्रय गजबार,चिदानंद सुंटे,भाग्यवंत ल.नायकुडे,मिलींद आढवळकर,कमलेश हाटकर, ज्ञानेश्वर सुर्डीकर,भरतराव रूपनवर, दशरथ सामल, अभिलाष अच्युगटला, चिंटू कांबळे, अमीर पाटील, औवसी दर्जी, सुरेश पडणूरे,आदी उपस्थित होते.



0 टिप्पण्या